Coronavirus Updates in India | Covid Patient News esakal
देश

देशातील कोरोना संसर्गात घट; गेल्या 24 तासांत 17070 नवे रुग्ण, 23 जणांचा मृत्यू

सकाळ डिजिटल टीम

देशभरात कोरोना विषाणूच्या संसर्गात घट झालीय.

नवी दिल्ली : देशभरात कोरोना विषाणूच्या संसर्गात (Coronavirus in India) घट झालीय. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 17070 नवीन रुग्ण आढळले आहेत. या कालावधीत 23 जणांचा मृत्यू झालाय. यापूर्वी गुरुवारी 18819 नवीन रुग्ण आढळले होते. आरोग्य मंत्रालयानं (Health Ministry) जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 14,413 रुग्ण विषाणू संसर्गातून बरे झाले आहेत. सक्रिय प्रकरणांची संख्या आता 1,07,189 वर पोहोचलीय. तर, दैनंदिन सकारात्मकता दर 3.40 टक्के आहे.(Coronavirus Updates in India)

गुरुवारी, महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या (Coronavirus in Maharashtra) संसर्गाची 3,640 नवीन प्रकरणं आढळून आली आणि तीन रुग्णांचा संसर्गामुळं मृत्यू झाला. या नवीन प्रकरणांसह राज्यातील कोविड -19 प्रकरणांची एकूण संख्या 79,76,114 झालीय, तर मृतांची संख्या 1,47,925 वर पोहोचलीय. बुधवारी महाराष्ट्रात कोविड-19 चे 3,957 रुग्ण आढळून आले आणि सात रुग्णांचा मृत्यू झालाय.

मुंबईत कोविड-19 चे 1,265 प्रकरणं नोंदवली गेली आणि एका रुग्णाचा मृत्यू झाला. अहमदनगर आणि कोल्हापूर जिल्ह्यात प्रत्येकी एक मृत्यूची नोंद झालीय. राज्यात कोविड-19 मुळं मृत्यूचं प्रमाण 1.85 टक्के नोंदवलं गेलंय. गेल्या 24 तासांत 4,432 रुग्ण संसर्गातून बरे झाले असून, राज्यात आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या 78,03,249 वर पोहोचलीय. राज्यातील रुग्ण बरं होण्याचा दर 97.83 इतका नोंदवला गेलाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT