2DG Medicine Sakal Media
देश

Coronavirus: 2DG औषधाचं उत्पादनं होणार सुरु; DRDOनं मागवले अर्ज

केवळ १५ कंपन्यांनाच यासाठी परवानगी असून प्रथम येणाऱ्याला प्रथम प्राधान्य मिळणार आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : संरक्षण संशोधन आणि विकास संस्था आर्थात DRDOद्वारे आपल्या बहुचर्चित 2-DG या कोरोना प्रतिबंधक औषधाचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरु करण्यात येणार आहे. यासाठी DRDO नं फार्मा कंपन्यांकडून अर्जही मागवले आहेत. हैदराबाद येथील डॉ. रेड्डीज लॅबच्या सहकार्यानं DRDOनं हे औषध इन्स्टिट्यूट ऑफ न्यूक्लिअर मेडिसिन अँड अलाईड सायन्सेसमध्ये (INMAS) विकसित केलं आहे. कोरोनाबाधित रुग्णांची लवकर रिकव्हरी तसेच रुग्णांना मेडिकल ऑक्सिजनची गरज भासत नाही, हे या औषधाच्या क्लिनिकल ट्रायल्समधून सिद्ध झालं आहे.

क्लिनिकल ट्रायल्सच्या निष्कर्षांतून हे लक्षात येतं की, ज्या रुग्णांना 2DG औषध देण्यात आलं त्यांची RT-PCR चाचणी तात्काळ निगेटिव्ह आली. DRDOनं मागवलेल्या अर्जात म्हटलंय की, १७ जूनपूर्वी फार्मा कंपन्यांना यासाठी अर्ज करता येणार आहेत. या अर्जाची टेक्निकल असेसमेंट समिती तपासणी करेल. केवळ १५ कंपन्यांनाच हे अर्ज देण्यात येणार असून प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर हे अर्ज वितरित केले जाणार आहेत.

अर्जासाठी लायसन्स आवश्यक

ज्या कंपन्या बोली लावण्याच्या प्रक्रियेत समाविष्ट असतील त्यांच्याजवळ ड्रग लायसन्स ऑथरिटीकडून देण्यात आलेलं अॅक्टिव्ह फार्मास्युटिकल इंग्रेडिएंट (API) बनवण्याचं ड्रग लायसन्स असायला हवं. त्याचबरोबर WHO ची गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसचं (GMP) प्रमाणपत्रही असणं आवश्यक आहे.

काय आहे 2DG औषधाचा फॉर्म्युला?

सिंथेटिक प्रक्रियेद्वारे डी-ग्लूकोजचा वापर करुन 2DG बनवण्याची प्रक्रिया केली जाते. पाच रासायनिक प्रक्रियांमधून गेल्यानंतर डी-ग्लूकोजमधून 2DG हे औषध बनवलं जातं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Water Supply: मुंबईत २२ ते २६ डिसेंबरपर्यंत पाणी संकट! 'या' भागांसाठी बीएमसीकडून महत्त्वाचा इशारा जारी, वाचा यादी...

Latest Marathi News Live Update : लोकांना जागरूक करण्यात आम्ही अपयशी ठरत आहोत - दलवाई

Upcoming IPO : 2026 मध्ये IPO ची लाट! पैसे तयार ठेवा; रिलायन्स जिओ, PhonePe ते Flipkart या 10 मोठ्या IPO वर बाजाराची नजर

Pachora Nagar Panchayat : पाचोरा पालिकेत शिवसेनेचा भगवा; २८ पैकी २२ जागांवर गुलाल, वाघ गटाला मोठा धक्का

Pune House Burglary : कुलूप तोडून सोनं-रोकड चोरी; कात्रज-मांजरीत दोन घरफोडीच्या घटना!

SCROLL FOR NEXT