Corona Update 
देश

Corona Update : देशात आतापर्यंत किती लोकांची टेस्ट झालीय माहितेय?

सकाळ ऑनलाईन

CoronaVirus Cases Update : कोरोनावरील लशींच्या प्रयोगासंदर्भात सकारात्मक बातम्या समोर येत असताना कोरोनाग्रस्तांच्या नव्या आकडेवारीतही घट होताना दिसत आहे. कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर देशात दिवसाला 90 हजारच्या घरात रुग्ण आढळल्याची नोंद झाली होती. यात आता कमालीची घट झाली असून मागील 24 तासांत 30 हजार नवे रुग्ण आढळले आहेत. हा आकडा दिलासा देणारा असाच आहे. कोरोनाची लागण होणाऱ्यांची संख्या कमी झाली असली तरी अद्यापही धोका टळलेला नसून आतापर्यंत घेत असलेली काळजी घेणं गरजेचच आहे. नव्या रुग्णांसह देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 98 लाखांच्या घरात पोहचला आहे.  

मागील काही दिवसांतील आकडेवारी ही कोरोनाचे संकट नियंत्रणात येत असल्याचे संकेत देणारी आहे. 13 दिवसांत सातत्याने नव्या रुग्णांचा आकडा हा 40 हजारच्या आत आहे. मागील 24 तासांत. 30,006 नवे रुग्ण आढळले असून 442 लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांपेक्षा यातून रिकव्हर झालेल्यांचा आकडा (33,494) हा अधिक आहे. कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळणाऱ्या देशांच्या यादीत भारत आता चौथ्या क्रमांकावर आहे. अमेरिका, ब्राझील, तर्कस्तान या राष्ट्रात भारतापेक्षा अधिक रुग्ण आढळत आहेत. कोरोनामुळे सर्वाधिक मृतांची नोंद झालेल्या देशांच्या यादीत भारत आठव्या स्थानावर आहे. 

भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 98 लाखांच्या घरात 
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत  98 लाख 26 हजार कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. यातील 1 लाख 42 हजार 628 लोकांनी आपला जीव गमावला आहे. एकूण सक्रीय रुग्णांची संख्या कमी होऊन ती आता 3 लाख 60 हजारवर आली आहे. आतापर्यंत 93 लाख 24 हजार लोकांनी कोरोनावर मात दिली आहे. सर्वाधिक सक्रीय रुग्ण असलेल्या यादीत भारत 9 व्या स्थानावर असून महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक रुग्ण आहेत. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

15 कोटीहून अधिक टेस्ट
 भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनुसार (ICMR) , 11 डिसेंबरपर्यंत  15 कोटी 26 लाख कोरोनाचे सॅम्पल टेस्ट करण्यात आले आहेत. यातील 10.65 लाख सॅम्पल या मागील 24 तासांतील आहेत. देशातील पॉझिटिव्हिटी रेट 7 टक्के इतका आहे.    

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi-Hindi controversy : मराठी शिकत नाही तोपर्यंत मुंबई सोडणार नाही; शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांचे मोठे विधान

ITI Courses: ‘आयटीआय’मध्ये सहा नवे अभ्यासक्रम; कौशल्य, रोजगारमंत्री मंगलप्रभात लोढा यांची माहिती

सायना नेहवालचा घटस्फोट, इन्स्टा पोस्टमधून केलं जाहीर; १० वर्षे रिलेशनशिपनंतर लग्न, ७ वर्षांचा संसार

Satara News :'परतीच्या प्रवासात माउली फलटणमध्ये'; मुक्‍कामस्‍थळी आरतीसाठी गर्दी, पालखीसोबत दोन हजार वारकरी

Lonavala Accident: ट्रकमधील पाइप पडून दोन महिला ठार; पाच जखमी, बोरघाटात पुणे-मुंबई जुन्या महामार्गावरील घटना

SCROLL FOR NEXT