coronavirus cases in india
coronavirus cases in india esakal
देश

देशात कोरोनाचे 13,166 नवे रुग्ण; 24 तासात 302 रुग्णांचा मृत्यू

सकाळ डिजिटल टीम

ओमिक्रॉनची लाट देशात कमकुवत झालीय.

नवी दिल्ली : देशातील कोरोनाच्या (Corona Virus) रुग्णांमध्ये घट सुरूच आहे. आज (शुक्रवार) आरोग्य मंत्रालयाकडून (Ministry of Health) सांगण्यात आलं, की गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 13,166 नवीन रुग्ण आढळले आहेत, तर 302 जणांना आपला जीव गमवावा लागलाय. तसेच 26,988 रुग्ण बरे झाले आहेत. मंत्रालयाच्या अहवालानुसार, सध्या देशात 1,34,235 सक्रिय रुग्ण आहेत. तसेच देशात आतापर्यंत 5,13,226 लोकांचा कोरोनामुळं मृत्यू झालाय. त्याचबरोबर आतापर्यंत 1,76,86,89,266 लोकांना लसीकरण करण्यात आलंय, असं त्यांनी नमूद केलं.

आपण आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीवर नजर टाकली, तर हे स्पष्ट होतं की ओमिक्रॉनची (Omicron Virus) लाट देशात कमकुवत झालीय. काल (गुरुवार) भारतात 15,102 नवीन रुग्ण आढळले आणि 278 लोकांचा मृत्यू झाला. आज आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाइटवर असं सांगण्यात आलंय की, केरळमध्ये देशात सर्वाधिक सक्रिय रुग्ण आहेत. जिथं 42473 लोक कोरोनावर उपचार घेत आहेत. त्यापाठोपाठ महाराष्ट्र (14242) आणि तामिळनाडू (9440) यांचा क्रमांक लागतो. गेल्या 24 तासांत केरळमध्ये सर्वाधिक 52 जणांचा मृत्यू झालाय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: डोंबिवलीत ईव्हीएम मशीन पडले बंद

IPL 2024 Playoffs : प्लेऑफसाठी नाही कोणत्या राखीव दिवस; पावसामुळे खेळखंडोबा झाला तर कसा लागणार निकाल?

आठवेळा मतदान करणारा अल्पवयीन तरुण ताब्यात, पुन्हा होणार मतदान; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई

Shantigiri Maharaj Nashik Lok Sabha: शांतिगिरी महाराजांच्या अडचणी वाढणार? EVM मशीनला घातला हार 

Hapus Season : कोकण हापूसचा हंगाम अंतिम टप्प्यात;उष्ण हवामानामुळे आवक घटली, हंगाम १५ दिवस आधीच संपणार

SCROLL FOR NEXT