दुलारचंद मुंडा दुलारचंद मुंडा
देश

अपघातात गेली वाचा; कोरोनाची लस घेतली अन् झाला चमत्कार!

कोरोनाची लस घेतल्यानंतर चमत्कार घडल्याचा दावा करणारे समोर येत आहेत; आता एका इसमाने चक्क...

सकाळ डिजिटल टीम

काही दिवसांपूर्वी कोरोनाची (coronavirus) लस घेतल्याने गुडघेदुखी कमी झाल्याचा दावा एका वृद्धाने केला होता. यामुळेच त्यांनी दोनदा नव्हे तर तब्बल ११ वेळा कोरोनाची लस घेतील होती. मात्र, बाराव्या वेळी लस घेण्याचा प्रयत्न केला आणि फसला. यामुळे हा प्रकार समोर आला होता. आता असाच एक प्रकार पुढे आला आहे. एका व्यक्तीने लस घेतल्यानंतर बेलता (Began to speak) येत असल्याचे सांगितले आहे. एका अपघातात त्यांचा आवाज गेला होता. दुलारचंद मुंडा (वय ५५, रा. सालगडीह, रोहन मुंडा, झारखंड) असे इसमाचे नाव आहे.

दुलारचंद मुंडा यांचा पाच वर्षांपूर्वी रस्ता अपघात झाला होता. या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. उपचारानंतर त्यांची प्रकृती बरी झाली होती. मात्र, त्यांच्या शरीराच्या अवयवांनी काम करणे बंद केले होते. तसेच त्यांचा आवाजही कमी होत गेला. जवळपास एक वर्ष त्यांना आयुष्य खाटेवरच घालवावे लागले होते. त्यांना नीट बोलताही येत नव्हते.

कुटुंबातील एकमेव कमावत्या व्यक्तीची प्रकृती अस्वस्थ झाल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला होता. दुलारचंद यांनी जीवनाची आशाही सोडली होती. मात्र, कोविशील्डची लस घेतल्याने त्यांचे जीवन सोपे झाले. कोविशील्ड लस (coronavirus) घेतल्याने पाच वर्षांपासून आयुष्याशी लढा देणाऱ्या दुलारचंद यांची प्रकृती बरीच झाली नाही तर ते व्यवस्थित बोलू लागले. उलट त्यांच्या शरीराला नवसंजीवनी मिळाली. पंचायत प्रमुख सुमित्रा देवी आणि माजी प्रमुख महेंद्र मुंडा यांनीही हे कोरोना लसीमुळे झाल्याचे सांगितले.

हा तपासाचा विषय

अंगणवाडी केंद्रातील सेविकेने चार जानेवारीला दुलारचंद मुंडा यांच्या घरी जाऊन कोरोनाची कोविशील्ड लस (coronavirus) दिली होती. पाच जानेवारीपासून त्यांचे निर्जीव शरीर काम करू लागले. दुलारचंद यांना मणक्याची समस्या आहे. ज्याचे अनेक प्रकारचे रिपोर्ट्स आम्ही बघितले आहे. त्यांची प्रकृती ठीक झाल्याने हा तपासाचा विषय झाला आहे, असे वैद्यकीय प्रभारी डॉ. अलबेल केरकेट्टा यांनी सांगितले. सिव्हिल सर्जन डॉ. जितेंद्र कुमार यांनी या घटनेला धक्कादायक म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Crime: शहर हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळले; मृत्यू कशामुळे?

Mumbai News: डोंबिवलीत रस्त्यांची चाळण! नागरिकांचा संताप, प्रशासनाविरोधात रिक्षाचालकांचा ठिय्या

Nashik News : पावसामुळे रस्त्यांची दुर्दशा: सातपूर-अंबड MIDC मधील खड्डेमय रस्ते; कामगार आणि उद्योजक त्रस्त

मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या केडियांनी मागितली माफी, चूक सुधारणार म्हणत राज ठाकरेंना केली नम्र विनंती; पाहा VIDEO

मराठीसाठी सत्तेवर लाथ, Raj Thackeray यांनी सांगितला 'तो' प्रसंग । Uddhav Thackeray । Raj Thackeray

SCROLL FOR NEXT