देश

रोखणं अशक्य! दोन महिन्यात धडकणार कोरोनाची तिसरी लाट

नामदेव कुंभार

Third Covid wave in India : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं मागील दोन ते तीन महिन्यापासून देशात हाहा:कार माजवला आहे. जून महिन्यापासून कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आल्याचं दिसत आहे. दुसऱ्या लाटेत आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाला होता. त्यामुळे अनेकांना आपले प्राण गमावावे लागले होते. दुसऱ्या लाटेतील स्थिती पाहून केंद्रासह राज्यानं तिसऱ्या लाटेची तयारी सुरु केली आहे. तिसरी लाट रोखण्यासाठी सर्वस्वी प्रयत्न केले जात आहेत. असं असतानाच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला रोखणं अशक्य असल्याचं वक्तव्य केंद्र सरकारच्या कोरोना कृती गटाचे सदस्य व दिल्लीच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे (एम्स) महासंचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनीच केलं आहे. NDTV च्या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते.

रणदीप गुलेरिया म्हणाले की, देशात दुसरी लाट आटोक्यात येत आहे. मात्र, पुढील सहा ते आठ आठवड्यात म्हणजेच दोन महिन्यात देशात कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते. तिसऱ्या लाटेला रोखणं अशक्य आहे. दुसऱ्या लाटेच्या तुलनेत तिसरी लाट सौम्य असू शकते, असेही ते म्हणाले. दरम्यान, दुसऱ्या लाटेत आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाला होता. बेड आणि ऑक्सिजनचा तुटवडा उडाला होता. दुसऱ्या लाटेत अनेक राज्यात लॉकडाउन लावण्यात आला होता. आता, अनेक राज्यात निर्बंध शिथिल करण्यात येत आहेत. यावर बोलताना एम्स चीफ यांनी पुढील दोन महिन्यात देशात तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली आहे.

'आपण अनलॉकची प्रक्रिया सुरु केली असून लोकांकडून पुन्हा नियमांचं उल्लघंन होत असल्याचं निदर्शनास येत आहे. असं वाटतेय की, पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत जे झालं, त्याकडून आपण काहीच शिकलेलो नाही. बाजारपेठांमध्ये पुन्हा गर्दी होत आहे. मास्क, सोशल डिस्टन्सिंगचा वापर होत नाही. लोकांच्या याच निष्काळजीपणामुळे देशात तिसरी लाट अटळ आहे. पुढील सहा ते आठ आठवड्यात देशात पुन्हा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होण्यास सुरुवात होईल. लोक नियमांचं पालन करत नाहीत. त्यामुळे देशात तिसरी लाट अटळ आहे, असं डॉ. रणदीप गुलेरिया म्हणाले.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Khandala : सातारा-पुणे मार्गावर भरधाव ट्रकची अनेक वाहनांना धडक, ट्रकचालक फरार

रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक फिस्कटले! हुतात्मा, वंदे भारत एक्स्प्रेस सोलापूरला वेळेत, पण दक्षिणेकडे जाणाऱ्या ‘या’ गाड्या २ ते ३ तासांनी धावताहेत उशिराने

Nanded Drug Seizure : शिवणीत तुरीच्या ताशेत लपवलेला ‘गांजा’ उघड; पोलिसांची धाड, ₹1.60 लाखांचा मुद्देमाल जप्त!

Dhule News : उभा केलेला ट्रॅक्टर उतारावरून मागे सरकला अन् विहिरीत कोसळला; ३ वर्षीय दोन मुली बुडाल्या, एकीला वाचवलं

मोठी बातमी! ३५ हजार शिक्षकांचा कापला जाणार एक दिवसाचा पगार; आंदोलनावेळी बंद राहिल्या राज्यातील २४ हजार शाळा; आता ९ अन्‌ १२ तारखेला नागपूरमध्ये आंदोलन

SCROLL FOR NEXT