Coronavirus India Update esakal
देश

पुन्हा धोका वाढला! देशात 24 तासांत 18,819 नवे रुग्ण; 39 जणांचा मृत्यू

सकाळ डिजिटल टीम

जगातील दुसऱ्या क्रमांकाची लोकसंख्या असलेल्या भारतात कोरोना महामारीचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागलाय.

नवी दिल्ली : जगातील दुसऱ्या क्रमांकाची लोकसंख्या असलेल्या भारतात कोरोना महामारीचा (Coronavirus in India) प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागलाय. गेल्या 24 तासांत इथं 18,819 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत, तर 39 जणांचा मृत्यू झालाय. कालच्या तुलनेत आज अनेक टक्‍क्‍यांनी कोरोना रुग्णांत मोठी वाढ झालीय. तसेच, दैनंदिन कोविड सकारात्मकता दर 4.16% नोंदवला गेलाय.

सक्रिय रुग्णांची संख्या 1 लाखांच्या पुढं

आरोग्य मंत्रालयाकडून (Health Ministry) सांगण्यात आलंय की, आता देशभरात कोरोनाचे 1,04,555 सक्रिय रुग्ण आहेत. यासह देशातील एकूण कोरोना बाधितांची संख्या आता 4.35 कोटी झालीय. त्याच वेळी सरकारी आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत 52,5116 लोकांचा कोरोनामुळं मृत्यू झालाय. कालच बोलायचं झालं तर देशभरात 39 जणांचा मृत्यू झाला. यामुळं कोविड मृत्यू दर 1.21 टक्के झाला आहे.

आता दिवसेंदिवस नवीन कोरोना रुग्ण वाढत आहेत ही चिंतेची बाब आहे. देशभरात 1 लाखांहून अधिक सक्रिय रुग्ण आहेत. एकूण संसर्गाच्या 0.24 टक्के सक्रिय प्रकरणं झाली आहेत. सध्या देशात रिकव्हरी रेट 98.55 टक्के नोंदवला गेलाय. गेल्या 24 तासांत देशभरात एकूण 13827 रुग्ण बरे झाले आहेत. देशभरात आतापर्यंत एकूण 4 कोटी 28 लाख 22 हजार 493 लोकांनी या साथीवर मात केलीय. कोरोनापासून बचाव करण्यासाठी देशभरातील लोकांना 14,17,217 डोस देण्यात आले. यासह आतापर्यंत लसीचे एकूण 1,97,61,91,554 डोस देण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

समृद्धीवर सराफ व्यापाऱ्याला लुटलं, 4,78,79,000 रुपये किंमतीचं सोनं अन् रोकड घेऊन दरोडेखोर फरार

‘हाफ सीए’ सीझन २: सीए बनायची स्वप्न पाहणाऱ्या तरुणांची कहाणी आता ओटीटीवर; ट्रेलर प्रदर्शित

Gold-Silver Rate Today: सोन्याचा दर खाली, चांदीतही घसरण! तुमच्या शहरातील ताजे भाव तपासा

Latest Marathi News Updates : उदय सामंतांनी घेतली शरद पवार यांची भेट...

Airtel Recharge : एअरटेलचा पुन्हा धक्का! 'या' रिचार्ज प्लॅनचे दर झाले कमी, पण ग्राहक का नाराज? जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT