देश

म्हणूनच देशावर आली तिसऱ्या लॉकडाऊनची वेळ; स्थिती चिंताजनक

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली :  देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या ४० हजारांच्या घरात पोचली असून मागच्या चोवीस तासांमध्ये आतापर्यंतचे सर्वाधिक म्हणजे ७८ लोक मृत्युमुखी पडले आहेत. दरम्यान रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा दर भारतामध्ये बारा दिवस इतका वाढला असून, मृत्यूचे प्रमाण ३.२ टक्के म्हणजे अन्य कोरोनाग्रस्त देशांपेक्षा सर्वात कमी आहे, असा दावा केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी आज केला. दरम्यान, देशात रुग्णांची संख्या आणि मृतांची संख्या कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. त्यामुळेच दुसऱ्यांदा लॉकडाऊनमध्ये वाढ करण्यात आलीय. देशात 4 मेपासून तिसरा लॉकडाऊन लागू होत असून, त्याची मुदत 17 मेपर्यंत आहे.

हर्षवर्धन यांनी सांगितले की, कोरोनाच्या चाचण्या करणाऱ्या प्रयोगशाळांची संख्याही वेगाने वाढत असून सध्या ३१० सरकारी आणि १११ खाजगी प्रयोगशाळा सज्ज आहेत. आतापावेतो विविध राज्यांमध्ये १० लाख चाचण्या पूर्ण झाले असून एका दिवसामध्ये ७४,००० चाचण्यांची क्षमता देशाकडे आहे. आरोग्यमंत्री म्हणाले की, काही दिवसांपूर्वी भारताला आयात कराव्या लागणाऱ्या PPE किट व N९५ मास्कचेही उत्पादन देशात वेगाने सुरू झाले आहे. देशात आता दरदिवशी दोन लाखांहून जास्त PPE किटचे उत्पादन होत आहे. केंद्राकडून आतापावेतो ५० लाखांहून जास्त मास्क आणि २० लाखांहून जास्त कीट देण्यात आलेल्या आहेत. ९९ देशांना भारताने हाइड्रोक्सीक्लोरोक्वीन, पेरासिटामॉल या औषधांचा पुरवठा केला आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

देशातील स्थिती 
३१९ जिल्हे : कोरोनाचा प्रभाव नाही 
२८४ जिल्हे : नॉन हॉटस्पॉट 
१३० जिल्हे : हॉटस्पॉट 

दहा हजारांहून अधिक बरे 
देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या चाळीस हजारांपर्यंत, तर मृतांची संख्या तेराशेवर पोहोचली आहे. १११ विदेशी लोकांनाही कोरोनाची लागण झाली आहे. देशातील सक्रिय कोरोनाग्रस्तांचा आकडा २८,०४६ आहे. मागच्या चोवीस तासांमध्ये आतापर्यंतचे सर्वाधिक ७८ रुग्ण दगावले आहेत. बरे होऊन घरी जाणाऱ्यांची संख्या वाढून १०,६३२ वर गेली आहे. यात एक विदेशी नागरिकही आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th pay commission : १२ लाख कर्मचाऱ्यांना होणार मोठा फायदा ! १८ हजार रुपये बोनससह महागाई भत्ता अन् बरंच काही...

Success Story: जिल्हाधिकारी होण्याचं बालपणीचं स्वप्न... अपयश आलं, नोकरी सोडली, पण जिद्द सोडली नाही; ऐश्वर्यम UPSCत देशात १०वी

Yavatmal Healthcare: १०२ वर वारंवार फोन, तरी रुग्णवाहिका आली नाही; राळेगावात जंगलातच महिलेची प्रसूती

Marathi News Live Updates : लोहगावमध्ये रस्त्यावरील खड्ड्याला चक्क चिकटपट्टी लावून पुणेकराचे अनोखे आंदोलन, महापालिकेच्या कारभाराचा जाहीर निषेध

दीड तासांचा प्रवास ५ मिनिटांत पूर्ण होणार! वर्सोवा केबल-स्टेड पुलास हिरवा कंदील, २१ किमीचे अंतर अवघ्या दीड किमीवर

SCROLL FOR NEXT