Usha Thakur Usha Thakur
देश

‘... त्यामुळे व्हायरस मला त्रास देऊ शकत नाही’; भाजप नेत्याचा दावा

मी सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी अग्निहोत्र करते

सकाळ डिजिटल टीम

माझा रुमाल तुमच्या मास्कपेक्षा चारपट मजबूत आहे. ३० वर्षांपासून मी सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी अग्निहोत्र करते. त्यामुळे माझी प्रतिकारशक्ती वाढते. त्यामुळे व्हायरस मला त्रास देऊ शकत नाही, असे मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) पर्यटन मंत्री आणि भाजपच्या (BJP) फायरब्रँड नेत्या उषा ठाकूर म्हणाल्या. मास्क न घालण्याचे कारण विचारल्याने त्यांनी सदर युक्तिवाद केला.

उषा ठाकूर (Usha Thakur) या खांडव्याच्या प्रभारी मंत्री आहे. दोन दिवसांच्या दौऱ्यात त्यांनी जिल्हा रुग्णालयाची पाहणी करण्याबरोबरच विविध पक्षांच्या कार्यक्रमांना हजेरी लावली. मात्र, कोणत्याही कार्यक्रमात त्यांच्या चेहऱ्यावर मास्क दिसत नव्हता. सर्किट हाऊसमध्येही मंत्री उषा ठाकूर (Usha Thakur) यांनी मास्क नसलेल्या लोकांकडून अर्ज घेऊन समस्या ऐकून घेतल्या. इतकेच नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठकीच्या दालनातून बाहेर आल्यावर मास्क न लावता लोकांच्या समस्या ऐकत राहिल्या.

राज्यभरात कोरोनाचा संसर्ग (coronavirus) झपाट्याने वाढत आहे. लोकांना मास्क घालण्याबाबत आणि सोशल डिस्टन्सिंगबाबत जागरूक केले जात आहे. असे न करणाऱ्यांना दंडही ठोठावला जात आहे. दुसरीकडे भाजपच्या नेत्या उषा ठाकूर मास्क न घालण्याचे वेगळेच कारण सांगत आहे. महाराष्ट्रात राजकीय नेते मोठ्या प्रमाणात कोरोना पॉझिटिव्ह आढळत आहे. यावरूनही त्या काही शिकल्याचे दिसत नाही, हेच आता म्हणावे लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिलांना ऑफिसमध्ये बोलवायचा, नंतर स्वत:चे मूत्र पाजून...; कॅप्टन खरातचा विकृतपणा वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल

X Down: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' डाऊन! कोट्यवधी युजर्सना तांत्रिक अडचणींचा फटका

कोकणाला डावलून केंद्राचा यूपीला मान! दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद, दादर-गोरखपूर ट्रेन सुरू; वर्षानुवर्षांच्या मागणीवर पाणी

Baramati Vidhan Sabha: बारामती पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार? शरद पवार गटाच्या भूमिकेवर केलं भाष्य

Malegaon Crime : राष्ट्रवादी कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; मारेकरी सीसीटीव्हीत कैद, आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु

SCROLL FOR NEXT