Coronavirus News in India | Covid-19 Patient Updates esakal
देश

देशात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ; 24 तासांत 17,073 नवे रुण, 21 जणांचा मृत्यू

सकाळ डिजिटल टीम

भारतात कोरोनाच्या (Coronavirus in India) प्रकरणांमध्ये सातत्यानं चढ-उतार होत आहे.

नवी दिल्ली : भारतात कोरोनाच्या (Coronavirus in India) प्रकरणांमध्ये सातत्यानं चढ-उतार होत आहे. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, सोमवारी (27 जून) भारतातील दररोजच्या कोरोना रुग्णांमध्ये पुन्हा वाढ झालीय. गेल्या 24 तासांत 17,073 नवीन प्रकरणं नोंदवली गेली आहेत. गेल्या एका दिवसांत 21 जणांचा कोरोनामुळं मृत्यू झालाय. रविवारच्या तुलनेत आज 45 टक्के अधिक रुग्ण आढळले आहेत. गेल्या एका दिवसात 15,208 लोक बरे झाले आहेत. (Covid-19 Patient Updates)

देशात सक्रिय रुग्णांची संख्या 94 हजारांच्या पुढं

देशात सक्रिय रुग्णांची संख्या 94 हजार 420 आहे, जी एकूण प्रकरणांच्या 0.21 टक्के आहे. देशातील कोरोनाचे एकूण रुग्ण 4,34,07,046 वर पोहोचले आहेत. देशात आतापर्यंत 5,25,020 लोकांचा कोरोनामुळं मृत्यू झालाय. एकूण पुनर्प्राप्ती प्रकरणांची संख्या 4,27,87,606 आहे. सोमवारच्या प्रकरणांमध्ये रविवारच्या तुलनेत 45% वाढ झालीय. रविवारी 11,739 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. 25 जणांचा मृत्यू आणि 10,917 लोक बरे झाले.

कोरोना रिकव्हरी रेट 98.57 टक्के

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सोमवारी सांगितलं की, कोरोना रिकव्हरी रेट (Corona Recovery rate) 98.57 टक्के आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) नुसार, गेल्या 24 तासांत 3,03,604 नमुना चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्याच वेळी, आतापर्यंत एकूण नमुना चाचणी 86.10 कोटी ओलांडलीय.

महाराष्ट्रात बीए व्हेरिएंटचे पाच रुग्ण

राज्यात बीए 4 व्हेरिएंटचे 3 तर बीए 5 व्हेरिएंटचे 2 असे एकूण पाच रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी तीन पुरुष, तर दोन स्त्रिया आहेत. सर्व रुग्ण मुंबई येथील असून, त्यांचा अहवाल पुणे बी. जे. वैदयकीय प्रयोगशाळेने दिलाय. राज्यातील या रुग्णांची संख्या 54 झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

शी... हे काय वागणं! ५२ वर्षांच्या राम कपूरने २५ वर्षीय मुलाला जबरदस्ती केलं किस; 'लॉकअप' २ चा व्हिडिओ व्हायरल

Bombay High Court : पोटगीची मागणी म्हणजे खंडणीच, उच्च न्यायालयाची महत्त्वाची टिप्पणी, नेमकं काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Update : मुंबईत पावसाची संततधार, समुद्राला मोठी भरती

IND vs ENG 1st T20I पूर्वी अभिषेक शर्माला बसला मोठा धक्का; जसप्रीतबाबतही ICC कडून महत्त्वाचे अपडेट्स, नेमकं काय घडलंय?

SCROLL FOR NEXT