corona, covid 19
corona, covid 19 
देश

भय इथले संपत नाही; देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा चाळीस लाखांच्या घरात

सकाळ ऑनलाईन टीम

नवी दिल्ली : कोरोनाबाधितांच्या संख्येने देशात चाळीस लाखांचा टप्पा पार केला असून आज शनिवारी हाती आलेल्या आकडेवारीनुसार एकूण कोरोनाबाधितांची संख्या ही 40,23,179 इतकी झाली आहे. मागील चोविस तासात 86,432 इतके नवे रुग्ण सापडले आहेत. गेल्या 24 तासांतील 1089 मृतांसह आजवरच्या एकूण मृतांची संख्या ही 69,561 वर जाऊन पोहोचली आहे. सध्या भारतात 8,46,395 अॅक्टीव्ह केसेस असून 31,07,223 लोक यातून बरे झाले आहेत. गेल्या काही दिवसांत भारतात दिवसाला 80,000 हून अधिक लोक कोरोनाबाधित होत असून हा वाढणारा आकडा चिंताजनक असल्याने सर्वच स्तरात भितीचे वातावरण पाहायला मिळत आहे.  

कोरोनाच्या प्रादूर्भावामुळे अर्थव्यवस्थेवर विपरित असा परिणाम झाला असून जीएसटीच्या संकलनात अडचणी आलेल्या असून अर्थव्यवस्थेला अॅक्ट ऑफ गॉडचा सामना करावा लागत असल्याचं अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी म्हटलं होतं. परवाच भारताच्या सांख्यिकी विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार भारताचा जीडीपी -23.09 टक्क्यांनी घसरला असून यापूर्वी इतकी घट कधीही झालेली नव्हती.  आतापर्यंत जागतिक स्तरावर 26,521,304 लोकांना कोरोनाची लागण झाली असून 873,131 लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. तर 17,638,249 लोक यातून बरे झाले आहेत.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT