नवी दिल्ली : भारतात गेल्या २४ तासांत करोना संसर्गाची एका दिवसात सर्वाधिक, म्हणजे १७ हजारांपेक्षा अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. तर, २४ तासांत एकूण ४०७ बळींची नोंद झाली आहे. कालच्या आकडेवारीनुसार आता भारतात कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या आता ०४ लाख ९० हजार ४०१ इतकी झाली आहे. तर, मृतांची संख्याही १५ हजारांच्या पुढे गेली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
दरम्यान एक दिलासादायक बाब म्हणजे देशातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले असून ते ५७.४३ टक्के झाल्याचे आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीत म्हटले आहे. भारतात सध्या एक लाख ८९ हजार ४६३ रुग्णांवर उपचार सुरू आहे. तर, ०२ लाख ८५ हजार ६३७ जणांना उपचार करून घरी सोडण्यात आल्याची माहिती केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, कोरोना संसर्गाच्या दैनंदिन वाढीचा विचार करता, आतापर्यंतचे सर्वाधिक रुग्ण काल (ता. २५) रोजी एका दिवसात आढळसे असून तो आकडा १७ हजार २९६ आहे. कोरोनामुळे दिवसभरात ४०७ जणांचा मृत्यू झाल्यामुळे मृतांची एकूण संख्या १५ हजार ३०१ इतकी झाली आहे. कोरोनाबाधितांची संख्या १४ हजारांहून अधिक वाढण्याचा हा सलग सातवा दिवस होता. २० जून रोजी १४ हजार ५१६, २१ जून रोजी १५ हजार ४१३, २२ जून रोजी १४ हजार ८२१, २३ जून रोजी १४ हजार ९३३, तर २४ जून रोजी रुग्णांच्या संख्येत १५ हजार ९६८ रूग्णांची वाढ झाली. याचाच अर्थ, करोना संसर्गाच्या प्रकरणांत २० जूनपासून एक लाख रुग्णांची भर पडली असून, १ जूनपासून रुग्णसंख्या २.८२ लाखांहून अधिक वाढली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.