Coronavirus Updates esakal
देश

मोठा दिलासा! देशात कोरोना रुग्णांची संख्या घटली; एका दिवसात 6594 नवीन रुग्णांची नोंद

सकाळ डिजिटल टीम

भारतात कोरोना विषाणूची चौथी लाट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Coronavirus Updates : भारतात कोरोना विषाणूची चौथी लाट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ओमिक्रॉनच्या BA.4 आणि BA.5 (Omicron Variant) या नवीन उप-प्रकारांच्या प्रवेशामुळं आणखी चिंता वाढलीय. दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून देशात नवीन कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत आहे. मात्र, आज सलग दुसऱ्या दिवशी देशात नवीन रुग्णांच्या संख्येत घट झालीय.

गेल्या 24 तासांत देशात कोरोना विषाणूचे 6,594 नवीन रुग्ण आढळले आहेत. काल म्हणजेच, 13 जून रोजी एका दिवसात 8,084 नवीन रुग्ण आढळले आणि 10 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झालाय. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या (Union Ministry of Health) म्हणण्यानुसार, देशात सक्रिय रुग्णांची संख्या 50,548 वर पोहोचलीय. तर, एकूण संसर्गाच्या 0.12 टक्के सक्रिय प्रकरणं आहेत. त्याच वेळी, एका दिवसात 4,035 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत एकूण 4,26,61,370 बाधित रुग्ण बरं होण्याचं प्रमाण आहे. पुनर्प्राप्ती दर 98.67 टक्के आहे. तर, दिवसाचा सकारात्मकता दर 2.05 टक्के आणि साप्ताहिक सकारात्मकता (Corona Positive) दर 2.32 टक्के आहे.

सोमवारी देशाची राजधानी दिल्लीत 614 नवीन रुग्ण आढळले आहेत. या कालावधीत एकाही कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झालेला नाहीय. दिल्लीत एका दिवसात 495 बाधित रुग्ण बरे झाले आहेत. सक्रिय प्रकरणांची संख्या 2,561 आहे. दिल्लीतील सकारात्मकतेचा दर 7.06 टक्के झालाय, तर एक दिवस आधी सकारात्मकता दर 4 टक्क्यांच्या वर होता.

मुंबईत 1118 नवे रुग्ण आढळले

मुंबईत कोरोनाच्या (Corona in Mumbai) रुग्णांमध्ये सातत्यानं वाढ होत आहे. सोमवारी शहरात कोरोनाचे 1118 नवे रुग्ण आढळून आले आहेत. कस्तुरबा हॉस्पिटल (Kasturba Hospital) मुंबईच्या अहवालानुसार, मुंबईत ओमिक्रॉन सब-वेरियंट BA.4 चे 3 आणि BA.5 प्रकारातील 1 रुग्ण आढळले आहेत. सर्वजण होम आयसोलेशनमध्ये बरे झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT