Basavaraj Bommai esakal
देश

राज्यात Omicron चे रुग्ण सापडताच कर्नाटक सरकार अलर्ट

सकाळ डिजिटल टीम

राज्यात ओमिक्रॉनचे रुग्ण आढळल्यानंतर कर्नाटक सरकार सतर्क झाले आहे.

बंगळुरू (कर्नाटक) : कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन (New Coronavirus Variant Omicron) या नवीन प्रकाराची दोन प्रकरणं समोर आल्यानंतर, कर्नाटक सरकार (Karnataka Government) सतर्क झाले असून विविध स्तरावर खबरदारीचा उपाय करत आहे. दरम्यान, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी आज (शुक्रवार) बंगळुरूमध्ये नवीन प्रकारावर चर्चा करण्यासाठी उच्चस्तरीय बैठक बोलावलीय. या बैठकीत राज्यातून समोर आलेल्या ओमिक्रॉनच्या दोन प्रकरणांवर उपाययोजनाबाबत चर्चा होणार आहे. याशिवाय, नवीन मार्गदर्शक तत्त्वांबाबत तज्ज्ञ आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली जाणार आहे.

बोम्मई म्हणाले, आज आम्ही तज्ञ आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहोत आणि त्यात उपाययोजनांबाबत चर्चा करणार आहोत. म्हणूनच, आम्ही एक विस्तृत योजना तयार केलीय. मी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया (Mansukh Mandaviya) यांच्याशी बोललो असून अहवाल आणि काही मार्गदर्शक तत्त्वे लवकरच जारी केली जातील, असं त्यांनी सांगितलं. कर्नाटकात काल ओमिक्रॉनच्या दोन रुग्णांची चाचणी पाॅझिटिव्ह आलीय. 'नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिकल सायन्सेसला पाठवलेल्या काही कोविड चाचणी नमुन्यांच्या अहवालाच्या आधारे केंद्रानं दोन ओमिक्रॉन प्रकरणांची पुष्टी केलीय. मात्र, सविस्तर अहवालाची प्रतीक्षा आहे.

ते म्हणाले, मी आरोग्यमंत्री आणि मुख्य सचिवांना सविस्तर अहवाल घेण्याच्या सूचना केल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आज तज्ज्ञ आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावण्यात आलीय. केंद्र सरकारच्या तज्ज्ञांशीही या विषयावर चर्चा केली जाणार आहे. कर्नाटकात ओमिक्रॉन प्रकाराच्या दोन प्रकरणांची पुष्टी झाली असली, तरी प्रयोगशाळेचा अहवाल अद्याप राज्य सरकारकडं अधिकृतपणे आलेला नाही. बोम्मई यांनी गुरुवारी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांची भेट घेऊन ओमिक्रॉन विषाणूबाबत चर्चा केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Drug Racket : पुण्यात एमडी ड्रग्ज विक्रीसाठी डिलिव्हरी अ‍ॅपचा वापर; मोठे रॅकेट उघड, चार जण अटकेत

Satara Politics: सातारा झेडपीची अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड रद्द करा;राष्ट्रवादीचे विभागीय आयुक्तांकडे अपील, जिल्हाधिकारी, एसपींबाबत तक्रार!

Yo Yo Honey Singh Pune show : यो यो हनी सिंगचा पुण्यातला शो होणार रद्द, थेट एसपींकडे तक्रार; गाण्यावर घेत आक्षेप

What is Anjaneri Ropeway Project? हनुमान भक्तांसाठी मोठी बातमी! सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी अंजनेरीला मिळणार नवं रूप; आता डोंगरावर चढण्याची कसरत संपणार!

NCP MLAs leaving party : राष्ट्रवादी काँग्रेसचे २५ ते ३० आमदार पक्ष सोडणार?, हसन मुश्रीफांनी एका वाक्यात कंडका पांडला

SCROLL FOR NEXT