देश

संपुर्ण देशाला हादरा देणारी बातमी! लवकरात लवकर लस न आल्यास भारतात दररोज बाधितांची संख्या 'इतकी' होणार

सकाळ वृत्तसेवा

मुंबई: भारतातील कोरोनाची साथ लवकरच आटोक्यात येईल अशी आशा प्रत्येकजण बाळगून आहे, पण पुढील वर्षी भारतात दिवसाला अडीच लाखाहून जास्त बाधित एका दिवशी आढळतील, असा इशारा देण्यात आला आहे. 
कोरोनाचे रुग्ण वाढणार असल्याचे अंदाज रोज व्यक्त केले जात आहेत. आता मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या अंदाजाने भारतीयांची धास्ती चांगलीच वाढेल. त्यांच्या अहवालानुसार नुसार पुढील वर्षी हिवाळ्यात भारतात दिवसाला पावणे तीन लाखापर्यंत कोरोना रुग्ण आढळतील असा इशारा देण्यात आला आहे. याच अंदाजानुसार अमेरिकेत 95 हजार 400, दक्षिण आफ्रिकेत 20 हजार 600, इराणमध्ये 17 हजार, इंडोनेशियात 13 हजार 200, ब्रिटनमध्ये 4 हजार 200, नायजेरिया तसेच तुर्कीत प्रत्येकी 4 हजार, फ्रान्समध्ये 3 हजार 300 तर जर्मनीत 3 हजार रुग्ण रोज आढळण्याची शक्यता आहे. 

भारतात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णात सातत्याने वाढ होत आहे. आता कोरोनावरील लस किंवा औषध न सापडल्यास त्या रुग्णात वाढ वेगाने वाढ होईल, असा इशारा मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीने दिला आहे.  या टेक्नॉलॉजिच्या स्लोन स्कूल ऑफ मॅनेजमेंटमधील तेथील हझिर राहमंदाद, टी वाय लिम आणि जन स्टेर्मन यांनी जगभरातील कोरोना साथीचा अभ्यास केला आहे. त्यानुसार भारतातील कोरोना रुग्णांची संख्या 2021 मध्ये दिवसाला सरासरी 2 लाख 87 हजारांनी वाढणार आहे. 

जगभरात 2021 च्या हिवाळ्यापर्यंत 24 कोटी 90 लाख रुग्ण असतील, तसेच 17 लाख 50 हजार जणांचे कोरोनामुळे निधन झाले असेल. जगातील 84 देशांना याचा सर्वाधिक फटका बसलेला असेल. कोरोनावरील लस तसेच औषध न मिळाल्यास हे घडणार असल्याचे अहवालात आवर्जून म्हंटले आहे. सुरक्षित अंतर आणि सरकारने साथ रोखण्यासाठी केलेल्या उपायांवरच कोरोनाची साथ अवलंबून असेल, 

अभ्यासकांनी 84 देशातील कोरोना रुग्णवाढीचा अभ्यास करुन हा अहवाल सादर केला आहे. त्यात सध्या होत असलेल्या चाचणी, त्या चाचणीत प्रत्येक दिवसाला 0.1 टक्क्यांची झालेली वाढ त्याचबरोबर एका नव्या रुग्णामुळे आठ जणांना बाधा होईल असे गृहीत धरण्यात आले आहे. त्याचबरोबर अभ्यासाठी संशयीत रुग्ण, बाधा होण्याचा धोका असलेल्या व्यक्ती, बाधीत तसेच कोरोनातून बरे झालेले यानुसार अभ्यास करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तानला खरंच T20 World Cup चा गांभीर्य असेल तर...! R Ashwin ने सांगितला विजयाचा मंत्र, इंग्लंडला अडचणीत आणणारी चाल...

जुन्या आठवणी आणि नव्या कथा; मराठी भाषा गौरव दिनानिमित्त घरबसल्या पाहा हे ब्लॉकबस्टर मराठी चित्रपट

Latest Marathi News Live Update : बनावट कॉल सेंटरच्या माध्यमातून अमेरिकन नागरिकांची फसवणूक, पोलिसांनी केला पर्दाफाश

MHT CET Admission : ‘एमएचटी सीईटी’च्या प्रवेश नोंदणीस २७ फेब्रुवारीपर्यंत विलंब शुल्कासह मुदतवाढ

Thane News: मुरबाड नगर पंचायतमध्ये सत्तांतराची नांदी? नगराध्यक्ष संतोष चौधरींची कसोटी; किसन कथोरेंना शह देणारे आता भाजपच्या गोटात

SCROLL FOR NEXT