Rahul gandhi and Bhagwant mann 
देश

Rahul Gandhi : काँग्रेस चेंज नव्हे, तर एक्सचेंज होतेय, राहुल गांधींनी आता...; ‘आप’ची टीका

सकाळ डिजिटल टीम

मुंबई – मागील काही दिवसांपासून काँग्रेसची सातत्याने पिछेहाट होत आहे. मात्र आम आदमी पक्ष मजल दरमजल करत अनेक राज्यांमध्ये आपले पाय पसरत आहे. त्यातच आज पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी पंजाबमधील आपल्या सरकारच्या कामगिरीची माहिती देताना काँग्रेसवर कडाडून टीका केली. (Rahul Gandhi news in Marathi)

गुजरातमधील पराभवानंतर राहुल गांधी म्हणाले होते की, गुजरातेत आप आले नसते तर त्यांनी भाजपचा पराभव केला असता. यावर भगवंत मान म्हणाले की राहुल गांधी यांनी किती वेळा गुजरात दौरा केला आहे. पश्चिमेकडे निवडणूक असताना राहुल गांधी पुर्वेकडे पदयात्रा करत होते. त्यामुळे राहुल यांनी आधी त्यांच्या टायमिंगमध्ये सुधारणा करून घ्यावी.

भगवंत मान पुढे म्हणाले की, मध्य प्रदेशातील जनतेने काँग्रेसला निवडून दिले. पण आज तिथे भाजपची सत्ता आहे. कर्नाटकात कोणाचे सरकार होते? मात्र आज भाजप सत्तेच्या खुर्चीवर बसले आहे. गुजरातमध्ये काँग्रेसने निवडणूक लढवलीच नाही. काँग्रेस हा आता चेंज नाही, तर एक्सचेंज पक्ष बनलाय. काँग्रेस कोमात गेली असून गरीब झाली आहे, त्यामुळे त्यांना आमदार विकून उदरनिर्वाह करावा लागत असल्याची जहरी टीका मान यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Summer Heat : पुणे शहरात उन्हाचा तडाखा वाढला; बुधवारी ‘यलो अलर्ट’, तापमान पाऱ्याची चाळिशीकडे झेप

पगारवाढीसाठी हजारो कर्मचारी आक्रमक, रस्त्यावर उतरून आंदोलन; गाड्या पेटवल्या, पोलिसांवर दगडफेक

Malvan Ice Mystery : कोकणात निसर्गाचा अजब चमत्कार! निळ्याशार आकाशातून थेट घरावर पडला 5 किलोचा बर्फाचा गोळा; मान्सून लांबणीवर पडण्याचे संकेत?

Gold Rate Today: युद्धाच्या भीतीने सोनं स्वस्त! आजचा भाव किती? सोन्यात आणखी घसरण होणार?

Stock Market Today: शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स 1,500 अंकांनी खाली; कारण काय? कोणत्या शेअर्सला फटका?

SCROLL FOR NEXT