देश

Corruption : निवृत्त स्टोअर कीपर निघाला कोट्यवधी रुपयांचा मालक ; आलिशान घर पाहून लोकायुक्त टीमला बसला धक्का..

Corruption : बेहीशेबी मालमत्तेच्या तक्रारीच्या आधारे त्यावर गुन्हा दाखल

सकाळ डिजिटल टीम

Corruption : मध्यप्रदेशमध्ये एक निवृत्त स्टोअर कीपर कोट्यवधी रुपयांचा मालक निघाला आहे. लोकायुक्तांकडे बेहीशेबी मालमत्तेची तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर पथकाने छापा टाकत या स्टोर कीपरची चौकशी केली.

संबंधित स्टोर किपरकडे तब्बल दहा कोटींची मालमत्ता आढळून आली आहे. यावेळी त्या कर्मचाऱ्यांचे आलिशान घर पाहून लोकायुक्त पथक चक्रावून गेले.

मध्यप्रदेश मधील भोपाळ येथे स्टोर किपर पदावरून निवृत्त झालेल्या एका कर्मचाऱ्यांच्या घरावर लोकायुक्तांच्या पथकाने छापा टाकला. दरम्यान या निवृत्त स्टोर कीपरकडे दहा कोटीं होऊन अधिकची मालमत्ता सापडली.

संबंधित स्टोअर कीपरचे नाव अश्फाक अली असून तो राजगड जिल्हा रुग्णालयात माजी स्टोर कीपर होता. बेहीशेबी मालमत्तेच्या तक्रारीच्या आधारे त्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे

संबंधित स्टोर कीपरच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर सोळाहून अधिक स्थळांवर मालमत्ता असल्याची माहीती समोर येत आहे. याचबरोबर 50 हून अधिक मालमत्तांची चौकशी सुरू आहे. जेव्हा लोकायुक्तांच्या पथकाने अश्फाक आली यांच्या घरावर छापा टाकला तेव्हा इंटरियर पाहून संपूर्ण टीम थक्क झाली.

मॉड्युलर किचन, लाखो रुपयांचे झुंबर, रेफ्रिजरेटर, टीव्हीशिवाय महागडा सोफा आणि शोकेस पाहुन टीम थक्क झाली. अशफाक अलीच्या घरातून सुमारे 46 लाखांचे दागिने आणि सुमारे 20 लाखांची रोकड सापडली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT