Cosmic Flows 4 largest map 
देश

‘कॉस्मिकफ्लोज-४’मध्ये ५६ हजार आकाशगंगा

ब्रह्मांडाची व्याप्ती दाखविणारा सर्वांत मोठा नकाशा तयार

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : आकाशदर्शन करताना आपल्याला रात्री चमचमणाऱ्या चांदण्या दिसतात. सूर्याभोवती फिरणाऱ्या आपल्या आकाशगंगेप्रमाणे हजारो आकाशगंगा अंतरिक्षात आहेत. पृथ्वीपासून लाखो किलोमीटर दूरवरील सुमारे ५६ हजार आकाशगंगांचा नकाशा संशोधकांच्या पथकाने तयार केला आहे. या नकाशातून अवकाशाचा पसारा किती मोठा आहे आणि त्याच्या निर्मितीला किती काळ लोटला आहे, हे समजते.

‘कॉस्मिकफ्लोज-४’ या नावाच्या नकाशात एकूण ५५ हजार ८७७ एवढ्या प्रचंड संख्येने आकाशगंगा आहेत. नकाशावरून ७५ किलोमीटर प्रतिसेकंद गतीच्या सुत्राला बळकटी मिळते. संशोधकांनी अंतराळाचे अंतर मोजण्यासाठी आठ वेगवेगळ्या पद्धतींचा वापर केला आहे.

यातील दोन पद्धती नव्या आहेत तर इतर सहा जुन्या अभ्यासातून तयार केल्या+ आहेत. या सर्व पद्धती वापरून तयार झालेल्या सूत्रानुसार नकाशा रेखाटला आहे. आकाशगंगा सतत भ्रमण करीत असल्याने त्यांचा प्रकाश कमी-जास्त होत असतो. यातून बाहेर पडणाऱ्या प्रकाशातून त्यांच्या अंतराचा अंदाज घेता येतो. यासंबंधीचा लेख ‘द ॲस्ट्रोफिजिकल जर्नल’मध्ये नुकताच प्रसिद्ध झाला आहे.

नकाशातून मिळणारी माहिती

  • ‘कॉस्मिकफ्लोज-४’मधून ५६ हजार आकाशगंगांमधील अंतर निश्‍चित करणे

  • आकाशगंगांमधील सामूहिक अंतर

  • आकाशगंगांची फिरण्याची गती

  • अवकाशात अब्जावधी संख्येने असलेल्या ताऱ्यांचा शोध घेणे

विविध पद्धतींचा अभ्यास करून त्यातील निष्कर्षांचे विश्‍लेषण करून नकाशा तयार केला आहे. यामध्ये त्रुटी असू शकते, पण हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा व अधिक अचूक नकाशा आहे.

- आर. ब्रेंट टुली, खगोलशास्त्रज्ञ, ॲस्ट्रोनॉमी इन्स्टिट्यूट, हवाई विद्यापीठ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gram Panchayat Elections : राज्यातील 15,155 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बिगुल वाजणार! 'या' दिवशी प्रसिद्ध होणार अंतिम मतदार यादी; कधी होणार मतदान?

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! कृषी पंपांचे ४८ हजार कोटींचे जुने वीजबिल माफ; महायुती सरकारचा निर्णय

ROHIT SHARMA RECORDS: रोहित शर्माचे 'हे' ५ जागतिक विक्रम मोडणं अशक्य! नंबर १ रेकॉर्ड तर कदाचित कधीच तुटणार नाही

Latest Marathi News Live Update : बांधकाम कामादरम्यान गॅस पाइपलाइनचे नुकसान झाल्याने गळती

Success Story : एका मिस्ड कॉलने बदलले नशीब! भारतीय इंजिनिअरने अमेरिकेत उभी केली 8300 कोटी रुपयांची AI कंपनी, नेमकं कसं केलं पाहा

SCROLL FOR NEXT