Milkha Singh  ANI
देश

'फ्लाइंग सिख' पंचतत्वात विलीन; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

पोस्ट कोविडनंतर प्रकृती बिघडल्यानंतर झुंजारु वृत्तीच्या महान खेळाडूची प्राणज्योत मालवली.

सुशांत जाधव

देशाचे महान धावपटू मिल्खा सिंग पंचतत्वात विलीन झाले. शनिवारी चंदीगडमध्ये शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. फ्लाइंग सिघ (Flying Sikh) नावाने ओळखल्या जाणाऱ्या मिल्खा सिंग यांनी शुक्रवारी रात्री चंदीगडच्या पीजीआय रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. पोस्ट कोविडनंतर प्रकृती ढासळल्याने झुंजारु वृत्तीच्या महान खेळाडूची प्राणज्योत मालवली. एका आठवड्यापूर्वीच त्यांची पत्नी निर्मल कौर यांचे वयाच्या 85 वर्षी निधन झाले होते. स्वत: कोरोनाचा सामना करत असल्यामुळे त्यांना आपल्या पत्नीच्या अंत्यसस्कारालाही उपस्थितीत राहता आले नव्हते.

शनिवारी चंदीगड येथील सेक्टर-8 मध्ये असलेल्या निवासस्थानापासून मिल्खा सिंग यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. शकडो लोक या अंत्ययात्रेत सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. सायंकाळी 5 वाजता सेक्टर 25 मधील स्मशानभूमीत त्यांचे पार्थिव आणण्यात आले होते. पंजाब आणि हरियाणातील वरिष्ठ मंत्र्यांनी पार्थिवावार पुष्पगुच्छ वाहून श्रद्धांजली वाहिली.

WHO च्या प्रमुखांनीही वाहिली श्रद्धांजली

जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस अधनोम घेब्रेयेसूस यांनी देखील महान खेळाडूला श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी ट्विटच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 'WHOSEARO चे गुडविल अँम्बेसिडर मिल्खा सिंगजी (Milkha Singh) यांच्या निधानाची वार्ता ऐकून दु:ख झाले. हेल्थ प्रमोशनसाठी तुम्ही जागितक आरोग्य संघटनेला जी मदत केली त्याबद्दल धन्यवाद. मिल्खा सिंग यांच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे, असा उल्लेख जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी केलाय.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटच्या माध्यमातून दु:ख व्यक्त केले होते. देशाने एक महान खेळाडू गमावला, अशा शब्दात मोदींनी मिल्खा सिंग यांना श्रद्धांजली वाहिली होती. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी देखील ट्विटच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली होती. मिल्खा सिंग देशातील दिग्गज खेळाडूपैकी एक होते. त्यांनी आपल्या देशाचे नाव उंचावणारी कामगिरी करुन दाखवली. अखेरच्या श्वासापर्यंत त्यांनी क्रीडा क्षेत्रात आपले योगदान दिले, असा उल्लेखही राजनाथ सिंह यांनी आपल्या ट्विटमध्ये केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याचे भाव कोसळले! सलग चौथ्या दिवशी मोठी घसरण; तुमच्या शहरात आता किती भाव?

Jan Shatabdi: जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये तांत्रिक बिघाड, 3 तासांपासून एकाच ठिकाणी ठप्प; प्रवाशांचा खोळंबा

Karad Encroachment : कऱ्हाडच्या वारुंजी फाट्यावर पहाटे अतिक्रमणावर हातोडा; महामार्गालगतची सहा व्यावसायिक खोकी जेसीबीने जमीनदोस्त

Marathi News Live Updates: ९० कोटींच्या रस्ता निविदेवरून आमदाराचा महापालिका आयुक्तांना धमकीचा आरोप; ठेकेदाराच्या पात्रतेवरून नेमका काय घडला वाद?

Divya Mittal IAS Resignation : आयएएस पदाचा राजीनामा, आता राजकारणात एंट्री; दिव्या मित्तल यांची मोठी घोषणा, म्हणाल्या...

SCROLL FOR NEXT