Corona Vaccine Corona Vaccine
देश

लसनिर्मितीसाठी हाफकिन बायोफार्माला मान्यता

उत्पादन वाढवण्यासाठी केंद्र सरकारने हैदराबादस्थित भारत बायोटेक कंपनीसोबत तंत्रज्ञान हस्तांतर करार केला आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कोरोना प्रतिबंधक लशींचे देशांतर्गत उत्पादन (Vaccine Production) वाढवण्यासाठी केंद्र सरकारने हैदराबादस्थित भारत बायोटेक (Bharat Biotech) कंपनीसोबत तंत्रज्ञान हस्तांतर करार केला आहे. यानुसार लसनिर्मितीसाठी हाफकिन बायोफार्माला मान्यता दिली होती. या लशीच्या निर्मितीसाठी बीएसएल (जैविक सुरक्षा प्रयोगशाळा) उभारण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. येत्या दोन महिन्यांत लॅब उभारणी आणि चाचणीची प्रक्रिया पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे. (Vaccine Production Updates)

गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात राज्य सरकारच्या मालकीच्या हाफकिन बायोफार्माला कोव्हॅक्सिन लस निर्मितीसाठी मान्यता दिली होती. संस्थेच्या उत्पादन विभागाचे महाव्यवस्थापक सुभाष शंकरवार म्हणाले, की कोणत्याही लसनिर्मितीसाठी सुरक्षा प्रयोगशाळेची गरज असते. ही प्रयोगशाळा ‘आयसीएमआर’ आणि हाफकिनच्या शास्त्रज्ञांच्या देखरेखीखाली तयार केली जाईल. या ‘बीएसएल’ प्रयोगशाळेचे बांधकाम पूर्ण झाल्यावर महिनाभर त्याची चाचणी केली जाईल. यामध्ये लस तयार करण्यासाठी प्रयोगशाळा कितपत सुरक्षित आहे, याची तपासणी केली जाईल.

उत्पादन प्रक्रिया

प्रयोगशाळेच्या निर्मितीनंतर लस तयार करणार

लशीची तीन महिने चाचणी केली जाणार

लशीत दोष आहेत की नाही, असतील तर ते कोणते, हे चाचणीतून समजेल

सकारात्मक परिणामानंतर लसनिर्मितीला सुरुवात

शेवटच्या टप्प्यात ती बाजारात उपलब्ध होईल

एका वर्षात कोव्हॅक्सिनचे २२.८ कोटी डोस तयार करण्याचा कंपनीचा प्रस्ताव आहे. लस लवकरात लवकर बाजारात आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. लशीसाठी सरकारकडून अनुदान मिळाले आहे.

- डॉ. संदीप राठोड,

व्यवस्थापकीय संचालक, हाफकिन बायोफार्मा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT