VIRAL VIDEO 
देश

VIDEO: जोडपं KTM बाईकवर करत होतं 'रोमँटिक' स्टंट; पोलीस अधीक्षकांनी रंगेहात पकडलं; पाहा व्हिडिओ

Couple Caught On KTM Bike Video: एक तरुण केटीएम बाईकवर आपल्या प्रेयसीला पेट्रोलच्या टाकीवर बसवून स्टंट करत होता.

कार्तिक पुजारी

जशपूर- छत्तीसगडच्या जसपूरमधून एक घक्कादायक व्हिडिओ समोर येत आहे. एक जोडपं महामार्गावर बाईकवर स्टंट करताना दिसत आहे. सदर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे पोलीस अधीक्षकांसमोरच हा प्रकार घडला आहे. पोलीस अधीक्षकांनी सदर प्रकाराचा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये शूट केला आहे.

एक तरुण केटीएम बाईकवर आपल्या प्रेयसीला पेट्रोलच्या टाकीवर बसवून स्टंट करत होता. गाडीवर त्यांचा रोमान्स देखील सुरु होता. त्याचवेळी पोलीस अधीक्षकांनी त्यांना रंगेहाथ पकडले. मिळालेल्या माहितीनुसार, बाईक चालकाला चलन फाडण्यात आले आहे. तरुणाचं नाव विनय असल्याचं कळतंय. तो जशपूरच्या हायवेवर आपल्या प्रेयसीवर भुरळ पाडण्यासाठी स्टंट करत होता.

रिपोर्टनुसार, जशपूरचे एसपी शशी मोहन सिंह हे कुंकरी येथून आपल्या कारमध्ये परतत होते. तेव्हा त्यांना राष्ट्रीय महामार्ग (NH)-43 वर एक जोडपं स्टंट करताना दिसलं. पोलिसांची गाडी पाहून तरुणाने पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण पोलीसांनी त्यांचा पाठलाग करुन पकडले. विनयने हेल्मेट घातले होते. त्याने आपल्या अठरा वर्षीय प्रेयसीला पेट्रोलच्या टाकीवर बसवलं होतं. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत असून याला अनेक लोक पाहात आहेत.

पोलीस अधीक्षक शशी मोहन सिंह म्हणाले की, ''आम्ही कुंकरी ते जशपूर येथून परतत होतो. त्यावेळी आम्हाला एक जोडपे धोकादायक स्टंड करताना दिसले. आम्ही त्यांना थांबवलं आणि त्यांची चौकशी केली. त्यांनी सांगितलं की ते मयाली धरण पाहण्यासाठी आले होते. आम्ही त्यांच्याविरोधात कारवाई केली आहे.''

अशा प्रकारचे स्टंट करु नका आणि पालकांनी आपल्या पाल्याकडे लक्ष ठेवावे, असं पोलीस अधीक्षकांनी म्हटलं आहे. अशाप्रकारचे धोकादायक स्टंट करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल असं पोलिसांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC ODI World Cup Schedule : प्रतीक्षा संपली! वन डे वर्ल्ड कप २०२७ स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर; India vs Pakistan सामना कधी व केव्हा; जाणून घ्या टीम इंडियाचे टाईमटेबल

Crop Panchnama Maharashtra : दुष्काळी तालुक्यांत सुट्टीच्या दिवशीही पीक पंचनामे करा; ग्रामसेवक, तलाठ्यांना जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, तीन दिवसाच्या सुट्ट्या रद्द

Dhananjay Munde : दुष्काळ प्रश्नी धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांना भेटले; पीएम किसान व नमो शेतकरी सन्मान चे दोन दोन हप्ते तातडीची मदत म्हणून वितरीत करण्याची मागणी

IND vs WI: प्रसिद्ध कृष्णानंतर वॉशिंग्टन सुंदरलाही मालिकेतून केलं OUT! चाहत्यांना धक्का, पण दुखापत नसताना का घेतला हा निर्णय?

विमान अपघात घडवून आणण्याचा कट आधीच शिजलेला? कोणाचा सहभाग? 'यूएई'ने दिले उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

SCROLL FOR NEXT