High court
High court  sakal
देश

'एका वर्षात नातवंड नाहीतर, 5 कोटी...': वृद्ध जोडप्याची मुलाविरुद्ध केस

रोहित कणसे

नवी दिल्ली : उत्तराखंड राज्यात एका वृद्ध जोडप्याने आपल्या मुलावर नातवंडासाठी मुलावर केस केल्याचा विचित्र प्रकरण समोर आला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, त्यांची नातवंडाची इच्छा एवढी तीव्र आहे की, त्यांनी एका वर्षात नातवंड अन्यथा ५ कोटी रुपयांची नुकसानभरपाई असा खटलाच ते मुलगा आणि सुनेवर भरणार आहेत.

मुलाच्या शिक्षणासाठी आणि अमेरिकेत प्रशिक्षणासाठी पैशांची व्यवस्था केल्यानंतर त्यांच्याकडे कोणतीही रक्कम उरली नसल्याचे प्रसाद यांनी सांगितले. एएनआयने त्यांच्या हवाल्याने म्हटले आहे की, 'आम्ही नातवंडांच्या आशेने २०१६ मध्ये मुलाचे लग्न केले होते. नातू असो की नात, आम्हाला त्याची पर्वा नाही. आम्हाला फक्त 'बाळ' हवे होते. ,

ते म्हणाले की, 'मी माझे सर्व पैसे मुलाला दिले, त्याला अमेरिकेत प्रशिक्षण दिले. आता माझ्याकडे पैसे नाहीत. घर बांधण्यासाठी आम्ही बँकेकडून कर्जही घेतले आहे. आपण आर्थिक आणि वैयक्तिक अडचणींचा सामना करत आहोत. आमच्या याचिकेत आम्ही मुलगा आणि सुनेकडून प्रत्येकी 2.5 कोटी रुपयांची मागणी केली आहे. प्रसाद यांच्या वकिलाने त्यांच्या मुलाविरुद्धच्या याचिकेत म्हटले आहे की, हे प्रकरण समाजातील कटू सत्य दाखवते. "आम्ही आमच्या मुलांना चांगल्या कंपनीत काम देण्यासाठी गुंतवणूक करतो. मुलांवर त्यांच्या पालकांची मूलभूत आर्थिक जबाबदारी असते. पालकांनी एक तर नातवंड किंवा पाच कोटी रुपये द्यावेत अशी मागणी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi : 'सामान्य नागरिकाच्या घराचं वीज बिल शून्यावर आणणं माझं ध्येय'; पंतप्रधान मोदींनी सांगितला फ्युचर प्लॅन

Latest Marathi News Live Update: राजन विचारे उमेदवारी अर्ज दाखल करायला निघाले; ठाकरेंची उपस्थिती

Mumbai News: महाराष्ट्र दिनानिमित्त दादरसह परिसरातील वाहतुकीत बदल, वाचा महत्वाची बातमी 

Viral Video: रायफल्सच्या धाकाने ताब्यात घेत जाळली कार, वाचा न्यायाधीशाच्या अपहरण आणि सुटकेचा थरार

Crime News: इन्स्टाग्रामवर यौवना अन् प्रत्यक्षात समोर आली दुसरीच बाई.. अपेक्षाभंगामुळे तरुणाने केली बेदम मारहाण

SCROLL FOR NEXT