न्यायालय शिक्षणक्षेत्रातील तज्ज्ञ नाही सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण sakal
देश

न्यायालय शिक्षणक्षेत्रातील तज्ज्ञ नाही; सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण

एखाद्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता आहे की नाही, हे संबंधित शिक्षणसंस्थेलाच ठरवू द्यायला हवे, असे स्पष्टीकरण आज सर्वोच्च न्यायालयाने दिले.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : न्यायालय शिक्षणक्षेत्रात तज्ज्ञ म्हणून काम करू शकत नाही. एखाद्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता आहे की नाही, हे संबंधित शिक्षणसंस्थेलाच ठरवू द्यायला हवे, असे स्पष्टीकरण आज सर्वोच्च न्यायालयाने दिले. नोकरीच्या जाहिरातीत नमूद केलेल्या आवश्यक शैक्षणिक पात्रतेशी तडजोड होऊ शकत नाही, असेही न्या.एम.आर.शहा आणि न्या.बी.व्ही.नागरत्ना यांच्या खंडपीठाने नमूद केले.

झारखंडमधील शाळांत वेगवेगळ्या श्रेणीत विविध विषयांसाठी पदव्युत्तर शिक्षकांच्या भरती प्रक्रियेसंदर्भात झारखंड उच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध दाखल झालेल्या याचिका फेटाळताना सर्वोच्च न्यायालयाने हे निरीक्षण नोंदविले. संबंधित जाहिरातीनुसार उमेदवाराकडे इतिहासातील पदवी किंवा पदव्युत्तर पदवी आवश्यक आहे, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

खंडपीठ पुढे म्हणाले, की आम्ही याचिकाकर्त्यांची पदवीची प्रमाणपत्रे तपासली. त्यावरून संबंधित याचिकाकर्त्यांनी इतिहासाच्या एका शाखेतील उदा. भारतीय प्राचीन इतिहास, भारतीय प्राचीन इतिहास आणि संस्कृती, मध्ययुगीन/आधुनिक इतिहास, भारतीय प्राचीन इतिहासातील पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे, असे निदर्शनास येते. आमच्या मते, इतिहासातील एका शाखेची पदवी मिळविल्याने एकूण इतिहासाची पदवी मिळविली, असे म्हणता येत नाही.

संबंधित नोकरीसाठी इतिहासाच्या पदवीची आवश्यकता आहे. त्याचप्रमाणे, जाहिरातीत आवश्यक शैक्षणिक पात्रतेचा स्पष्ट उल्लेख केला आहे. त्यात कोणतीही संदिग्धता नाही. त्यामुळे, इतिहासात पदवी/पदव्युत्तर पदवी नसणाऱ्यांची उमेदवारी रद्द करण्यात आली.

शिक्षणाच्या क्षेत्रात न्यायालय सामान्यत: तज्ज्ञ म्हणून काम करू शकत नाही. त्यामुळे, विद्यार्थी, उमेदवाराकडे आवश्यक शैक्षणिक पात्रता आहे की नाही याचा निर्णय शिक्षणसंस्थेलाच घेऊ द्यायला हवा. विशेषत: तज्ज्ञांची समिती या प्रकरणाचा विचार करत असेल तेव्हा हे समितीला ठरवू द्यावे.

- सर्वोच्च न्यायालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 2nd T20I: वेस्ट इंडिजला आली लहर, केला कहर! भारताचे २५० धावांचे विक्रमी लक्ष्य सहज पार केले, शे होपचे नाबाद शतक

Beed News : विद्यार्थी खरेदी-विक्रीतून बोगस संचमान्येचा महाघोटाळा; चंपावती विद्यालयात आढळले उत्तराखंडचे ३ बोगस विद्यार्थी

Ganja Farm Seized : गाढेजळगाव शिवारात गांजाची शेती उघड; ४३० झाडे जप्त, १८ लाख १९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल, शेतकरी आरोपीला अटक

IND vs WI 2nd T20I: W,W,W! ज्याने आस दाखवली, त्यानेच माती खाल्ली; Mayank Yadav च्या चूकीने मॅच गेल्यात जमा, नेमकं काय घडलं?

Delhi Protest: 30 हजार जवान तैनात अन् 200 जण ताब्यात; CJPच्या आंदोलनापूर्वी दिल्लीत काय-काय घडतंय?

SCROLL FOR NEXT