NEET Exam sakal
देश

NEET Exam : प्रश्‍नपत्रिका कशा पाठविल्या? कोठे ठेवल्या?‘नीट’ बाबत कोर्टाची ‘एनटीए’वर सरबत्ती; अनेक मुद्द्यांवर विचारणा

नीट’ प्रश्‍नपत्रिका फुटल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय चाचणी संस्थेवर (एनटीए) प्रश्‍नांची सरबत्ती केली.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : ‘नीट’ प्रश्‍नपत्रिका फुटल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय चाचणी संस्थेवर (एनटीए) प्रश्‍नांची सरबत्ती केली. प्रश्‍नपत्रिका लॉकरमध्ये कधी ठेवले, ते बाहेर कधी काढले, परीक्षा केंद्रांवर कसे पाठविले, असे प्रश्‍न विचारतानाच ‘पेपरफुटी’ झालीच कशी, याचा शोध घेणे महत्त्वाचे असल्याचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी स्पष्ट केले.

लॉकरमधून सकाळी साडेदहा ते अकराच्या दरम्यान वाजता प्रश्‍नपत्रिका बाहेर काढण्यात आल्याची माहिती ‘एनटीए’ने दिली. या प्रश्‍नपत्रिका दूतावासामार्फत १४ आंतरराष्ट्रीय केंद्रांकडे पाठविण्यात आल्याचेही ‘एनटीए’ने सांगितले. छपाई आणि वितरणादरम्यानचा कालावधी कमी असेल तर परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी करणाऱ्यांना त्यावर विचार करावा लागेल, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. ‘टेलिग्रॅम’च्या माध्यमातून प्रश्‍नपत्रिका फुटली असेल तर या प्रकरणाची व्याप्ती मोठी असू शकते, अशी टिपणीही न्यायालयाने केली.

न्यायालयाचे प्रश्‍न

  • प्रश्‍नपत्रिका लॉकरमधून कधी काढल्या?

  • वितरण कसे झाले?

  • तज्ज्ञांनी प्रश्‍नपत्रिका कधी तयार केल्या, ‘एनटीए’कडे कधी दिल्या?

  • छपाई कोठे झाली? वाहतुकीची व्यवस्था काय होती?

  • छपाई ते वितरण हा कालावधी किती?

हे मुद्दे विचाराधीन

प्रश्‍नपत्रिका कशी फुटली, हे तपासावे लागेल, असे न्यायालयाने स्पष्ट केले. ‘अनेक विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळाले, हा मुद्दाही विचारात घ्यावा लागेल. काही विद्यार्थ्यांनी एका राज्यात नोंदणी केली होती तर दुसऱ्या राज्यात परीक्षा दिली होती. अशा विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळाले. हा मुद्दाही महत्त्वाचा ठरतो,’ असे कोर्टाकडून सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना मार्च, एप्रिलचा हप्ता जमा झाला नाही, काळजी नसावी! कधी जमा होणार असे करा चेक?

सीएनजीच्या दरात पुन्हा वाढ, ३ दिवसात ३ रुपयांनी झाला महाग

Latest Marathi News Live Update : विदर्भ, मराठवाड्याला उष्णतेच्या लाटेचा तर कोकणात पावसाचा इशारा

‘मामाच्या गोव्याला जाऊया’ चे ठेका धरायला लावणारे टायटल साँग प्रदर्शित; अवधूत गुप्तेंच्या आवाजात स्वरबद्ध

Maharashtra Voter List: राज्यात एक कोटी मतदार वगळणार ? 'एसआयआर'मध्ये मुंबई, ठाणे, पुण्यात सर्वाधिक मतदार बाद होण्याचा अंदाज!

SCROLL FOR NEXT