Chandrababu Naidu 
देश

Chandrababu Naidu: चंद्राबाबूंना झटका! कोर्टानं फेटाळली 'ही' मागणी, आता तुरुंगातच रहावं लागणार

करोडो रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी चंद्राबाबू नायडू यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं अटक केली आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : कोट्यवधींच्या घोटाळ्याप्रकरणी सध्या तुरुंगात असलेले आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि तेलगू देसम पार्टीचे प्रमुख एन. चंद्राबाबू नायडू यांना तुरुंगात रहावं लागणार आहे.

कारण घरातच नजरकैदेत ठेवण्याची त्यांची मागणी विजयवाडा कोर्टानं फेटाळून लावली आहे. त्यामुळं हा नायडू यांच्यासाठी मोठा झटका मानला जात आहे. चंद्राबाबू यांना शनिवारी अटक करण्यात आली होती. (Court rejects jailed Chandrababu Naidu plea for house custody)

स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या निधीचा गैरवापर केल्याप्रकरणी फसवणुकीच्या गुन्ह्यात चंद्राबाबू नायडू यांना अटक करण्यात आली होती. त्यामुळं राज्य सरकारचं 300 कोटी रुपयांचं नुकसान झालं, असं आंध्र प्रदेश सीआयडी प्रमुख एन संजय यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं. रविवारी विजयवाडाच्या स्थानिक कोर्टानं चंद्राबाबू नायडू यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

दरम्यान, विजयवाडा इथल्या लाचलुचपत प्रतिबंधक ब्युरो (एसीबी) कोर्टानं मंगळवारी या प्रकरणातील सीआयडीच्या युक्तिवादाशी सहमती दर्शवली आणि चंद्राबाबू नायडू यांना हाऊस रिमांड नाकारला.

नायडू हे सध्या पूर्व गोदावरी जिल्ह्यातील राजमहेंद्रवरम मध्यवर्ती कारागृहात कैदेत आहेत. एसीबी कोर्टानं कारागृहाच्या अधीक्षकांना 73 वर्षीय नायडूंच्या जीविताला असलेला धोका लक्षात घेता त्यांना स्वतंत्र सेलमध्ये ठेवण्याचे निर्देश दिले होते. माजी मुख्यमंत्री नायडू यांना झेड प्लस सुरक्षा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आता वाहने पेट्रोल किंवा डिझेलवर नव्हे, तर पाण्यावर चालणार; 'वॉटर फ्यूल' तंत्रज्ञानामुळे खर्च कमी होणार, हे आहे तरी काय?

नातेवाईक नाहीत, आधार नाही; शेवटच्या प्रवासाची चिंता मिटवण्यासाठी वृद्धाने केलं स्वतःचं श्राद्ध

“मी स्क्रिप्ट वाचत नाही, तर लेखक किंवा दिग्दर्शकाकडून त्यांचं व्हिजन ऐकतो” सिनेमा निवडण्यावर सलमानचा खुलासा

Best Mileage Bikes : कमी पेट्रोलमध्ये जास्त चालतात 'या' 5 दमदार बाईक्स; सर्वाधिक मायलेज अन् किंमत लाखाच्या आतच

वल्लरीचा खोटेपणा उघड होणार? तू हि रे माझा मितवा मधील ट्विस्टने प्रेक्षक चकित

SCROLL FOR NEXT