vaccine SII 
देश

Covid-19: कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड लस भारतात कधी मिळणार?

सकाळ ऑनलाईन टीम

नवी दिल्ली: देशात कोरोनाच्या लसीचं सर्वजण वाट पाहत आहेत. देशात दिवाळीनंतर कोरोनाची दुसरी लाट आल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. कारण मागील काही दिवसांत कोरोनाचे रुग्ण वाढण्याचं प्रमाण वाढत आहे. जर कोरोनाची लस देशात उपलब्ध झाली तर ती पहिल्यांदा आरोग्य कर्मचारी, आरोग्य सेवक आणि अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्यांना देण्यात येणार असल्याचे सरकारने यापूर्वीच सांगितलं आहे. 

आता आपत्कालीन वापरासाठी सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या (SII) 'Covishield' लसीला मंजुरी देण्याची सरकारची तयारी आहे. ती यूकेमध्ये ऑक्‍सफर्ड-एस्‍ट्राजेनेकाच्या या लसीला तातडीची मंजुरी मिळण्याची वाट पाहत आहे. SII ने एस्‍ट्राजेनेका लसनिर्मितीसाठी भागीदारी केली आहे. तसेच देशात भारत बायोटेकच्या Covaxin लसीला फेब्रुवारीपर्यंत तातडीची मंजुरी मिळू शकते, म्हणजे 2021 पर्यंत देशात दोन लशी भारतात उपलब्ध होऊ शकतात.

जानेवारीपर्यंत  Covishield येऊ शकते-
सिरम इन्स्टिट्यूट डिसेंबरमध्ये भारतीय नियामक मंडळासमोर तातडीच्या मंजुरीसाठी आवेदन जारी करु शकते. सिरम इंस्टिट्यूटमधील एका अधिकाऱ्याने याबद्दल माहिती देताना सांगितले की, 'जर सगळं नियोजनानुसार झालं तर सिरमला डिसेंबरमध्ये तातडीची मंजुरी मिळू शकली तर जानेवारी-फेब्रुवारीपर्यंत लसीचा लस येण्याची शक्यता आहे.' सिरम इन्स्टिट्यूटने लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या पूर्ण केल्या असून लवकरच डेटाचा पाठपुरावा केला जाण्याची शक्यता आहे. भारतात ही लस 'कोविशील्‍ड'च्या नावाखाली उपलब्ध असेल. 

Covaxinला देखील आपत्कालीन मंजुरी दिली जाऊ शकते-
पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याची आकडेवारी सादर केल्यानंतर भारत बायोटेकच्या कॉवॅक्सिनलाही आपत्कालीन मंजुरी दिली जाऊ शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू असलेल्या लसीची सध्या डेटा तयार होत आहे. सर्व चाचण्या योग्य झाल्या तर फेब्रुवारी-मार्चपर्यंत एकापेक्षा अधिक लशी उपलब्ध होऊ शकतात असं मत उच्च अधिकाऱ्यांनी व्यक्त केलं आहे.

भारतात कोरोनावरील लस बनवत असलेली कंपनी सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ आदर पूनावाला यांनी कोरोनावरील लस पुढील वर्षी एप्रिल महिन्यापर्यंत येईल असं सांगितले आहे. सुरुवातीला ही लस आरोग्य कर्मचारी आणि वृध्दांना देण्यात येणार आहे.

सामान्य नागरिकांसाठी लसीच्या दोन डोसची किम्मत एक हजार रुपये असणार असल्याची माहितीही पुनावाला यांनी दिली आहे. पण हे शेवटच्या चाचण्या आणि नियामक संस्थांच्या मंजुरीवर अवलंबून असणार आहे. तसेच 2024 पर्यंत प्रत्येक भारतीयाला कोरोनाची लस दिली गेलेली असेल आणि भारतातील प्रत्येक व्यक्तीला लस द्यायला दोन-तीन वर्षे लागतील,अशी माहितीही आदर पुनावाला यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Heavy Rain Hailstorms: पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात गारपीट! वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; 'या' भागांना अलर्ट

Mutha Canal Overflow : मांजरी परिसरात मुठा कालवा ओव्हर फ्लो झाल्याने रस्त्यावर व झोपड्यांमध्ये शिरले पाणी, वाहतूक कोंडीत अडकले प्रवासी

शेतकऱ्यांना उजनीचे सलग ८० दिवस पाणी! धरणाचे ९ दरवाजे उघडले; उन्हाळी आवर्तनासाठी लागणार १७ टीएमसी, धरण ५७ टक्के भरलेले, वाचा...

Bidkin News : बिडकीन हादरले! विहिरीत बुडून २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू; मित्रांसमोरच घडली दुर्दैवी घटना

Pune Crime : गुंतवणूकदारांची फसवणूक; भाजपचा नेता शेखर चरेगावकरला अटक

SCROLL FOR NEXT