COVAXIN COVAXIN
देश

Covaxin Covid Vaccine Fraud: "राजकीय दबावामुळं 'कोव्हॅक्सिन' घाईनं बाजारात आणली"; नव्या खुलाशानं खळबळ!

कोव्हॅक्सिनच्या पात्रता प्रक्रियेतील एक बंधनकारक टप्पाही वगळण्यात आल्याचं भारत बायोटेकच्या एका संचालकानं मान्य केलंय.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : Covaxin Covid Vaccine Fraud : हैदराबादस्थित भारत बायोटेक या फार्मा कंपनीनं बनवलेली भारताची स्वदेशी कोविड प्रतिबंधक लस कोव्हॅक्सिन सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. कोविडच्या काळात ही लस घाईघाईनं बाजारात आणण्यात आली असल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे. यासाठी लस निर्माता कंपनीवर राजकीय दबाव होता, असं कंपनीच्या एका संचालकानं मान्य केलं आहे. द वायरनं याबाबत वृत्त दिलं आहे. (Covaxin Was Rushed Under Political Pressure Need for Speed says STAT Report)

भारत बायोटेकवर झालेल्या आरोपांना उत्तर देताना कंपनीच्या एका संचालकानं हे मान्य केलंय की, कोव्हॅक्सिन लशीच्या पात्रता प्रक्रियेतील एक बंधनकारक असलेला महत्वाचा टप्पा वगळण्यात आला, कारण आमच्यावर ही स्वदेशी लस वेगानं बाजारात आणण्यासाठी राजकीय दबाव होता. तपासणी यंत्रणेद्वारे या प्रक्रियेतील बदलांची परीक्षणं केली गेली. तसेच लशीच्या क्लिनिकल चाचण्या वेगानं करण्यात आल्या.

WHOच्या आरोपांना भारत बायोटेकनं दिलं नव्हतं उत्तर

अशा प्रकारे पहिल्यांदाच आरोपांवर भारत बायोटेकच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं भाष्य केलं आहे. एप्रिल महिन्यात वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) अर्थात जागतीक आरोग्य संघटनेनं योग्य प्रक्रियेद्वारे लस तयार झाली नसल्याचं सांगत संयुक्त राष्ट्रांना या लसीचा पुरवठा थांबवला होता. WHOनं असाही आरोप केला होता की, कोव्हॅक्सिनला आपत्कालिन वापरासाठी परवानगी मिळाल्यानंतर भारत बायोटेकनं या लशीच्या निर्मिती प्रक्रियेत काही बदल केला होता. त्यावेळी कंपनीनं या आरोपांना उत्तर दिलं नव्हतं, काय बदल केलाय हे सांगितलं नव्हतं.

केवळ कोव्हॅक्सनवरच आणली होती बंदी

दरम्यान, WHOनं भारत बायोटेकचा करेक्टिव्ह अॅक्शन प्लॅन नाकारला होता. त्याचबरोबर याच कारणासाठी कोव्हॅक्सिनवरील बंदी कायम ठेवली होती. या कारवाईबद्दल कंपनीनं स्पष्टीकरण देणारं कुठलंही निवेदन सादर केलं नव्हतं. जगातील सर्व लशींपैकी केवळ कोव्हॅक्सिन लशीवरच WHOनं बंदी आणली होती.

STAT च्या तपासणीत खळबळजनक खुलासे

STAT (Reporting from the frontiers of health and medicine) च्या तपासणीनुसार, या लसीसाठी घेण्यात आलेल्या क्लिनिकल चाचण्यांच्या तीन टप्प्यांमध्ये अनेक अनियमितता आढळल्या आहेत. रिपोर्टर ईड सिल्व्हरमन यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आउटलेटच्या तपासणीत असं आढळून आलं की, चाचण्यांच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात नोंदणी केलेल्या सहभागींची संख्या ही 'द लॅन्सेट इन्फेक्शियस डिसीज'मध्ये प्रकाशित केलेल्या संबंधित कागदपत्रांनुसार ट्रायल प्रोटोकॉल दस्तऐवजात नोंद केलेल्या संख्येपेक्षा भिन्न होती.

कुठलाही दबाव नव्हता - भारत बायोटेक

ज्यांना लस किंवा लसीकरण प्रक्रियेतील काही माहिती नाही अशा काही निवडक व्यक्ती आणि गटांनी मांडलेल्या COVAXIN विरुद्ध दिलेल्या वृत्ताचा आम्ही निषेध करतो. हे सर्वज्ञात आहे की त्यांनी संपूर्ण कोविडच्या काळात चुकीची माहिती आणि खोट्या बातम्या लावल्या होत्या. आम्ही जागतिक उत्पादन विकास आणि परवाना प्रक्रिया समजून घेण्यास अक्षम आहेत. COVAXIN च्या विकासाला गती देण्यासाठी कोणताही बाह्य दबाव नव्हता, असं भारत बायोटेक कंपनीनं द वायरच्या वृत्तावर स्पष्टीकरण देताना म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Violence : बाजूलाच सर्किट बेंच, वीज खंडित, प्रचंड गोंधळ, तलवारी, पोती भरून दगडं; अपुरी पोलिस यंत्रणा, कोल्हापुरात दोन गटातील राड्याचा घटनाक्रम असा...

Toll Free Scheme: ‘समृद्धी’वर चाचणीतच कटला ईव्ही वाहनांचा टोल! शासनाची घोषणा ठरली फोल, तांत्रिक अडचणी पाठ सोडेनात

Dhanashree Verma च्या सपोर्टमध्ये उतरली सूर्यकुमार यादवची पत्नी देविशा; म्हणाली, तुझ्या प्रती आदर...! नेटिझन्स म्हणायला लागले....

Latest Marathi News Updates : नागपूरसाठी ऐतिहासिक परंपरा लाभलेली काळी पिवळी मारबत मिरवणूक आज निघणार

PMC News : महापालिकेची मिळकतकर थकबाकी वसुलीसाठी कडक पावले; १७ हजार कोटी रुपये अद्याप येणे, महापालिकेकडून विविध उपाययोजनांवर भर

SCROLL FOR NEXT