shivraj sinh chauhan sakal
देश

‘शिव’ मुख्यमंत्री; कोरोनाचा धोका नाही

भाजप नेते तरूण चुग यांचे मध्य प्रदेशबाबत वक्तव्य

सकाळ वृत्तसेवा

भोपाळ (पीटीआय) : मध्य प्रदेशात (MP) ‘शिव’ (शिवराजसिंह चौहान) (Shivraj Singh Chouhan) मुख्यमंत्री तर ‘विष्णू’ (विष्णू दत्त) (Vishnu Dutt) भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यामुळे, राज्याला कोरोना (corona) विषाणू कोणताही धोका पोचवू शकत नाही, असे वादग्रस्त वक्तव्य भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस तरुण चुग यांनी ट्विटरवरून केले. (COVID-19 cant harm MP where Shiv is CM said Tarun Chugh has)

‘शिव’ मुख्यमंत्री आणि ‘विष्णू’ प्रदेशाध्यक्ष असताना कोरोना मध्य प्रदेशचे नुकसान कसे करू शकेल, असे ट्विट त्यांनी केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे भाजप कार्यकर्त्यांना कोरोना काळात स्वयंसेवा करण्यासाठी व इतर आरोग्यविषयक प्रशिक्षण देण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी चुग मध्य प्रदेशात आले होते. त्यावेळी, येत्या डिंसेबरपर्यंत देशभरात कोरोना लशीचे १३५ कोटी डोस पुरविले जातील, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, चुग यांच्या वक्तव्यावरून काँग्रेसने त्यांच्यावर टीकेची झोड उठविली. मध्य प्रदेशात यावर्षी जानेवारी ते मे दरम्यान कोरोनामुळे तीन लाखांहून अधिक जणांचे मृत्यू झाले. मात्र, भाजप नेते अशा प्रकारची वक्तव्ये करून पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून पाठ थोपटून घेण्यात धन्यता मानत आहेत, असे टीकास्त्र काँग्रेसचे प्रवक्ते भूपेंद्र गुप्ता यांनी सोडले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष विष्णू दत्त यांनीच भाजप नेते व कार्यकर्त्यांच्या कुटुंबातील साडेतीन हजार जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे मान्य केल्याचा दावाही त्यांनी केला.

मध्य प्रदेशात कोरोनाचे थैमान सुरू असताना मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान व भाजप प्रदेशाध्यक्ष विष्णू दत्त कुठे होते? ते निद्रिस्त होते का? भविष्यात ते कोरोनाला कसा आळा घालणार?, असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते भूपेंद्र गुप्ता यांनी उपस्थित केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT