Kerala Covid file photo
देश

केरळमध्ये कोरोनाचा उद्रेक; एकाच दिवसात ३१,००० रुग्णांची नोंद

केरळमध्ये टेस्ट पॉझिटिव्हिटी रेट १९.०३ टक्के

Amit Ujagare (अमित उजागरे)

थिरुवअनंतपुरम : देशभरात कोरोनाचा संसर्ग बऱ्यापैकी कमी झाला असल्याचं चित्र असताना केरळमध्ये कोरोनाचा उद्रेक झाला आहे. कारण बुधवारी दिवसभरात केरळमध्ये तब्बल ३१,४४५ नवे रुग्ण आढळून आले. तसेच २१५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर २०,२७१ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

काल मंगळवारी केरळमध्ये २४,२९६ कोरोनाचे रुग्ण आढळून आले होते. २७ मे २०२१ नंतर काल पहिल्यांदाच केरळनं २४,००० रुग्णांचा टप्पा पार केला होता. या दिवशी केरळमध्ये २४,१६६ रुग्ण आढळून आले होते. तसंच केरळमध्ये २० मे रोजी ३०,००० पेक्षा अधिक नवे रुग्ण आढळून आले होते. त्यावेळी रुग्णसंख्या ३०,४९१ वर पोहोचली होती.

दरम्यान, बुधवारी केरळमध्ये टेस्ट पॉझिटिव्हिटी रेट (TPR) १९.०३ टक्के राहिला. पण आता ओनम सणानंतर हा रेट २० टक्क्यांच्या पार जाईल, अशी भीती तज्ज्ञांनी वर्तवली आहे. बकरी ईदनंतर २७ जुलै रोजी केरळमध्ये रुग्णांची संख्या २०,००० पार गेली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT