देश

दिलासादायक! कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत असलीतरी...

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचा संसर्ग कमी करण्यासाठी मोठे प्रयत्न सुरु आहेत. त्यानुसार विविध उपचार पद्धतींचा वापर केला जात आहे. कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव ही एक चिंतेची बाब असताना मात्र दुसरीकडे याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत असली तरी दुसरीकडे कोरोनाच्या संसर्गामुळे होणाऱ्या मृत्यूदरात घट झाली आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. त्यानुसार गेल्या काही दिवसांपासून बहुतांश व्यवहार बंद होते. मात्र, आता लॉकडाऊन 5.0 मध्ये बऱ्याच प्रमाणात सवलत देण्यात आली आहे. आता देशात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 1,98,706 इतकी झाली आहे. देशात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. परंतु, सुदैवाने मृत्यूदरात वाढ होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनाबाधित रुग्णांची आकडेवारी

देशात 97,581 जणांवर उपचार सुरू आहेत. तर एकूण 95,526 रुग्णांवर उपचार करून डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशात आत्तापर्यंत 5,598 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली.

साडेचार हजारहून अधिक रुग्णांना डिस्चार्ज

गेल्या 24 तासांत 4835 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. केंद्र सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार, सौम्य आणि मध्यम लक्षणे असणाऱ्या कोरोनाग्रस्त रुग्णांमध्ये काही लक्षणं आढळली नाही तर त्यांना 10 दिवसानंतर निरोगी घोषित करून डिस्चार्ज दिला जातो.

मृत्युदरात घट

कोरोनामुळे होणारा मृत्यूदर 45 दिवसांपूर्वी 3.3 टक्क्यांवर होता. आता मात्र या मृत्युदरात घट होऊन हा आकडा 2.83 टक्क्यांवर पोहचला आहे. 18 मेला मृत्यूदर 3.15 टक्के होता तर 3 मे रोजी हा आकडा 3.25 टक्के होता. भारतात एका दिवसाचा सर्वाधिक मृत्युचा आकडा 230 वर आहे, अशी सरकारकडून आकडेवारी देण्यात आली आहे.

रिकव्हरी रेटमध्ये वाढ

कोरोनाग्रस्त रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणातही वाढ होत आहे. सध्याचा रिकव्हरी रेट 48.10 टक्क्यांवर पोहचला आहे. 18 मे रोजी रिकव्हरी रेट 38.29 टक्के होता. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी VVIP नाहीत, तातडीने सुनावणी घ्या; याचिकाकर्त्याच्या मागणीवर सुप्रीम कोर्टाने फटकारलं, म्हणाले...

Aditya Thackeray Shares Student Video : कोल्हापुरातील विद्यार्थ्याचा व्हिडिओ आदित्य ठाकरेंकडून शेअर; फडणवीसांना थेट सवाल, उद्धव ठाकरेंशीही फोनवरून चर्चा

Jalgaon News: तामिळनाडुचे मुख्यमंत्री विजय यांचं फेक अकाउंट, जळगाव कनेक्शन समोर; होमगार्डची चौकशी

Marathi News Live Updates : लोणी काळभोर पोलीस ठाण्यात ACB ची धाड

Education Institution Corruption: शिक्षण संस्थेत भ्रष्टाचाराचे आरोप, तपास समिती चौकशीला आली असतानाच प्राध्यापकाचा संशयास्पद मृत्यू; काय घडलं?

SCROLL FOR NEXT