देश

मेड इन इंडिया लस 90 टक्के प्रभावी; ठरणार 'गेम चेंजर'

सूरज यादव

कोर्बेव्हॅक्स असं नाव असलेली ही लस नोवाव्हॅक्स लसीसारखीच आहे. ही लस कोरोनाच्या व्हेरिअंटवर 90 टक्क्यांहून जास्त प्रभावी असल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे.

नवी दिल्ली - 'बायोलॉजिकल ई'ने तयार केलेली मेड इन इंडिया लस कोरोनावर 90 टक्के प्रभावी आहे. कोरोनाविरोधातील लढ्यात ही लस महत्त्वाची ठरेल असं सरकारच्या सल्लागार समितीमधील डॉक्टर्सनी म्हटलं आहे. केंद्राच्या कोविड वर्किंग ग्रुपचे अध्यक्ष एनके अरोरा यांनी सांगितलं की, लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरु आहे आणि लस ऑक्टोबरपासून उपलब्ध होईल.

कोर्बेव्हॅक्स असं नाव असलेली ही लस नोवाव्हॅक्स लसीसारखीच आहे. ही लस कोरोनाच्या व्हेरिअंटवर 90 टक्क्यांहून जास्त प्रभावी असल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे. नोवाव्हॅक्स भारतात सीरम इन्स्टिट्यूटमध्ये तयार होणार आहेत. सीरम इन्स्टिट्यूटकडून ऑक्सफर्डच्या एस्ट्राझेनकाची कोविशील्ड लस आधीपासून तयार केली जात आहे. नोवाव्हॅक्सप्रमाणेच बायो ई लस सुद्धा तिसऱ्या टप्प्यात आहे. आधीचे अनुभव पाहता या लसीबाबत उत्सुकता लागून राहिली आहे. ही लस वयोगटांसाठी सुरक्षित असून खूप प्रभावी असल्याचंही त्यांनी सांगितलं.

हैदराबादमधील बायोलॉजीकल ई कंपनी ही लस तयार करत असून कोर्बेव्हॅक्सची किंमत दोन डोससाठी 250 रुपये इतकी असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बायो ई लस ऑक्टोबरमध्ये उपलब्ध होण्याची शक्यता आहे. सध्या लशीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरु असल्याची माहिती डॉक्टर अरोरा यांनी सांगितलं.

कोर्बेव्हॅक्स लशीच्या 30 कोटी डोसची ऑर्डर केंद्राने दिली आहे. लसीच्या प्री क्लिनिकल आणि क्लिनिकल चाचण्यांना केंद्राकडून परवानगी देण्यात आले आहे. सध्या देशात लसीकरण मोहिम वेगाने वाढवण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Overhead Cable : ओव्हरहेड केबल धोरणाला स्थायीची मान्यता; अनधिकृत केबल वर्षभरासाठी होणार नियमित

'ऑपरेशन टायगर'चा दुसरा भाग खरंच येणार? मंत्री प्रताप सरनाईक यांचा दावा की मिश्किल टिपण्णी? कैलास पाटलांबद्दल काय म्हणाले?

RBI चा मोठा निर्णय! 'ही' सुविधा वेळेआधी होणार बंद; ग्राहकांसाठी काय बदलणार? जाणून घ्या...

Ajinkya Rahane Exclusive : अजिंक्यचे भारताकडून खेळण्याचे स्वप्न पूर्ण होईल की नाही, याची भीती होती.. पण तो खचला नाही! राधिकाचे डोळे भरून आले, रहाणेने सावरले...

Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील ३६,२११ कंपन्या बंद झाल्या? चर्चेवर देवेंद्र फडणवीसांचा खुलासा; शरद पवारांना सांगितलं सत्य

SCROLL FOR NEXT