covishiled vaccin 
देश

सीरमची लस किती प्रभावी? आदर पूनावाला यांनी दिली आनंदाची बातमी

सकाळ वृत्तसेवा

पुणे - कोरोनाच्या लशीची प्रतीक्षा संपूर्ण झगाला लागून राहिली आहे. सर्वसामान्यांना ही लस 2021 च्या पहिल्या तिमाहीत मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, फायझर आणि मॉडर्नाच्या लशी किती प्रभावी ठरल्या आहेत याचा डेटा आला होता. दोन्ही लशी 95 टक्के प्रभावी असल्याचं सांगण्यात आलं आहे. आता ऑक्सफर्डच्या लशीचा डेटाही समोर आला असून याची माहिती सिरम इन्स्टिट्यूटचे आदर पूनावाला यांनी दिली आहे. 

ऑक्सफर्ड आणि एस्ट्राझेनेका मिळून तयार करत असलेल्या लशीबाबत महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. चाचण्यांमधून असं समोर आलं आहे की, दोन्ही डोसचे एकत्रित विश्लेषण केल्यानंतर ऑक्सफर्डची लस 70 टक्क्यांहून जास्त प्रभावी ठरत आहे. तसंच पहिल्या टप्प्यातील डोसमध्ये लस 90 टक्क्यांहून जास्त प्रभावी ठरले असंही सांगण्यात आलं आहे. तसंच यामुळे लस कमी किंमतीत जगाला पुरवण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकल्याचं ऑक्सफर्डने म्हटलं आहे. 

आदर पूनावाला यांनी म्हटलं की, कमी किंमतीत उत्पादन होत असलेल्या कोरोनाच्या लशीचा पहिला डोस 90 टक्के तर दुसरा डोस 62 टक्क्यांपर्यंत प्रभावी ठरत आहे. याची सविस्तर माहिती आज सांयकाळपर्यंत देण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं. 

सिरम इन्स्टिट्यूट डिसेंबरमध्ये भारतीय नियामक मंडळासमोर तातडीच्या मंजुरीसाठी अर्ज करु शकते. सिरम इंस्टिट्यूटमधील एका अधिकाऱ्याने याबद्दल माहिती देताना म्हटलं की, 'जर सगळं ठरलेल्या नियोजनानुसार झाल्यास सिरमला डिसेंबरमध्ये तातडीची मंजुरी मिळू शकते. आणि ती मिळाली तर जानेवारी-फेब्रुवारीपर्यंत लस येण्याची शक्यता आहे.' 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT