astrazenca vaccine europe 
देश

केंद्र पाकिस्तानला लस पाठविणार; काँग्रेस, आपचा हल्लाबोल

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - कोरोना प्रतिबंधक लसीचा तुटवडा भासत असल्याची ओरड देशभरातून होऊ लागली असतानाच लस निर्यातीबद्दल आता केंद्र सरकारला जाब विचारला जाऊ लागला आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी लस निर्यातीला आक्षेप घेतला आहे, तर देशातील नागरिकांपेक्षा केंद्राला पाकिस्तानातील नागरिक महत्त्वाचे वाटत आहे. म्हणून त्या देशाला कोरोना भारत प्रतिबंधक लस निर्यात करणार असल्याची टीका आम आदमी पक्षाने केली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर केलेल्या चर्चेत ११ ते १४ एप्रिल या काळात लसीकरण महोत्सव करण्याचे आवाहन केले आहे. परंतु अनेक राज्यांमध्ये लसीचा साठा संपुष्टात आल्याचे चित्र आहे. अशा काळात हा उत्सव कसा करायचा, असा प्रश्‍न विचारला जात आहे.

‘आप’चे राष्ट्रीय प्रवक्ते राघव चढ्ढा यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन लसीकरण धोरणावर टीका केली. ते म्हणाले, ‘‘आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, राजस्थान, उत्तराखंड, ओडिसा, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, तेलगंणा यांसह सर्व राज्यातील लसीकरण येत्या दोन-चार दिवसांत थांबणार आहे. कारण लसींचा तुटवडा भासू लागला आहे. लसींचा पुरवठा झाल्याशिवाय या राज्यांमध्ये लसीकरण होऊच शकणार नाही. महाराष्ट्रात पुण्यात काल १०९, तर ओडिशात सातशेहून अधिक केंद्रे बंद झाली. एकीकडे देशातील सर्व राज्यातील लसींचा साठा संपुष्टात येत असताना भाजप सरकार लस निर्यात करीत आहेत.’’

‘‘भारतातील नागरिक लसीकरण केंद्राबाहेर लसीचे सुरक्षा कवच मिळण्यासाठी रांगा लावून आहेत. देशातील लस संपली आहे. भाजप सरकारने मात्र ८४ देशांना लसीचे साडेसहा कोटी डोस निर्यात केली आहे. बांगलादेश, म्यानमार, नेपाळ, मालदिव, अफगाणिस्तान, मॉरिशस यांसारख्या काही देशांना तर भारताने भेट म्हणून लसीचे डोस पाठविले आहेत. जगातील अमेरिका, ब्रिटन, कॅनडा यांसारख्या देशांनी त्यांच्या देशातील दोनवेळा लस देता येतील, एवढे डोस साठवून ठेवले आहेत. आपण मात्र देशवासियांचा विचार न करता लस निर्यात करीत आहोत,’’ असे चढ्ढा यांनी सांगितले.

दहशतवादी देशाला भारताची लस
केंद्र सरकारची आणखी धक्कादायक बाब म्हणजे आता हे सरकार पाकिस्तानला लसीचे साडेचार कोटी डोस देणार आहे. या सरकारला भारतीय नागरिक महत्त्वाचे आहेत, की दहशतवादाला पोसणारे पाकिस्तानी? भाजप आणि केंद्राने याचे उत्तर दिले पाहिजे. पाकिस्तान भारतात दहशतवादी निर्यात करीत आहे, तर भारत त्यांना जीवनदायी लसींचे डोस निर्यात करीत आहे. मानवी पातळीवर इतर देशांना मदत करा. परंतु आधी आपल्या देशातील नागरिकांच्या प्रती असलेले कर्तव्य केंद्र सरकारने बजावावे. देशातील सर्व नागरिकांना लसीचे दोन्ही डोस द्या, नंतर कुणाला हवी तेवढी लस पाठवा, अशी उद्विग्नता राघव चढ्ढा यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pilbhit Tiger Reserve: व्याघ्र प्रकल्पात विकेंड सफारी महागली; शनिवार-रविवारचे तिकीट २०० रुपयांवर, काय आहे कारण ?

Team India Live Streaming: सुपर संडे! भारताचे दोन मोठे सामने, Asia Cup Final अन् अफगाणिस्तानविरुद्ध रंगणार टी२०; कुठे पाहाणार?

Ukadiche Modak Recipe: केशराचा सुगंध, नारळ-गुळाची गोडी आणि 'हा' एक पदार्थ… बाप्पासाठी असे बनवा स्पेशल उकडीचे मोदक!

IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कोणाला मिळणार संधी? कर्णधार श्रेयस अय्यरने दिले उत्तर; ईशान किशनच्या दुखापतीवरही अपडेट

Machnur Siddheshwar Temple : माचणूरच्या सिद्धेश्वर मंदिरात प्रणिती शिंदेंकडून भाविकांची सेवा; ५ कोटी ४ लाखांच्या विकासकामांचा आढावा

SCROLL FOR NEXT