देश

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळंं, IT कंपन्यांमध्ये पुन्हा 'वर्क फ्रॉम होम'

सकाळन्यूजनेटवर्क

भारतामध्ये सध्या कोरोना महामारीची दुसरी लाट आली असून रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. देशभरात दररोज ५० हजारांपेक्षा जास्त रुग्णांची संख्या वाढत आहे. महाराष्ट्रासह, बंगळुरु, पंजाब आणि मध्य प्रदेशमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. बंगळुरुसह कर्नाटक राज्यातील वाढती कोरोना परिस्थिती पाहून अनेक आयटी फर्मनं वर्क फ्रॉम होमचा कालावधी आणखी तीन महिन्यांनी वाढवला आहे. बंगळुरुतील आयटी फर्मनं दिलेल्या माहितीनुसार, ३१ मार्च २०२१ रोजी  कर्मचाऱ्यांचा वर्क फ्रॉम होमचा कालावधी संपणार होता. मात्र, राज्यातील वाढती कोरोना रुग्णांची संख्या पाहाता वर्क फ्रॉम होमचा कालावधी तीन महिन्यांनी वाढवला आहे. आयटी फर्मनं बुधवारी आपल्या कर्मचाऱ्यांना याबाबतची माहिती दिली आहे.  

अनेक आयटी फर्मनं बुधवारी कर्मचाऱ्यांना ई-मेल आणि फोनच्या माध्यमांतून वर्क फ्रॉम होमचा कालावधी वाढवण्यात आल्याची माहिती दिली. अतिशय गरजेचं काम असल्याशिवाय कार्यालयात येऊ नये, अशी सुचनाही आयटी फर्मनं आपल्या कर्मचाऱ्यांना दिली आहे. यासोबतच कर्नाटक सरकारनेही कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमचा पर्याय दिला आहे. तसेच कार्यालयात ५० टक्केंच्या उपस्थितीबाबताचा आद्यादेशही कर्नाटक सरकारकडून काढण्यात आला आहे.  

बंगळुरुतील आघाडीच्या आयटी कंपनीनं नुकताच ३१ मार्च पर्यंत कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमचा पर्याय दिला होता. कोरोनाचा प्रादुर्भाव पाहून समोवारी कंपनीनं आपल्या कर्मचाऱ्यांना ई-मेलच्या साह्यानं पुढील तीन महिन्यापर्यंत हा कालावधी वाढवण्यात आल्याची सुचना दिली. बंगळुरुतील बहुराष्ट्रीय गुंतवणूक बँक आणि आर्थिक सेवा कंपनी यांनी बुधवारी आपल्या कर्मचाऱ्यांना पुढील तीन महिन्यापर्यंत वर्क फ्रॉम होम करण्याच्या सुचना दिल्या आहेत.  येथील आघाडीच्या एका आयटी कंपनीनं गेल्याच महिन्यात  कर्मचाऱ्यांना ३१ मे २०२१ पर्यंत वर्क फ्रॉम होम करण्याच्या सुचना दिल्या होत्या.  नॅसकॉम कंपनीचे उपाध्यक्ष के. एस. विश्वनाथ यांनी टीएनआयईला सांगितले की, बंगळुरु येथील अनेक आघाडीच्या आयटी कंपनीनं आपल्या कर्मचाऱ्यांच्या वर्क फ्रॉम  होमचा कालावधी जून महिन्यापर्यंत वाढवला आहे.  तर काही कंपन्यानं हा कालावधी सप्टेंबरपर्यंत केला आहे. 

बंगळुरुतील प्रमुख आयटी कंपन्यामध्ये गेल्या वर्षभरापासून वर्क फ्रॉम  होम सुरु आहे. तरीदेखील कामाच्या गुणवत्तेवर याचा कोणताही परिणाम झालेला नाही. या कालावधीत कंपन्याना नवीन प्रोजेक्ट्सही मिळाले. शिवाय नवीन कर्मचाऱ्यांची भरतीही करण्यात आल्याची माहिती, नॅसकॉम कंपनीचे उपाध्यक्ष के. एस. विश्वनाथ यांनी दिली. कर्नाटक राज्याचे मुख्य सचिव पी. रवी कुमार यांनीही सरकारी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉर्म होमचा पर्याय दिला आहे. पण ५० टक्के कर्मचारी कार्यालयात उपस्थित असावे अशी अटही घालण्यात आलेली आहे. राज्यातील वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव पाहून कुमार यांनी हा निर्णय घेतला. 

कर्नाटक विधानसभा आणि मंत्रालयात जवळपास तीन हजार कर्मचारी कार्यरत आहेत. तसेच दररोज हजारो जण येथे आपल्या कामानिमित्त येत असतात. त्यामुळे मंत्रालय आणि विधानसभा येथे सॅनिटाझर आणि तापमान मोजणीची मशिन बसवण्यात आलं आहे. तरिही यामधून कोरोनाबाधित रुग्ण पडताळू शकत नाही. काही कर्मचाऱ्यांना आधीच कोरोनानं गाठलं आहे. यामधील काही पाटबंधारे विभागातील कर्मचारी आहेत, अशी माहिती कर्नाटक कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष गुरुस्वामी यांनी दिली.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic : पुण्यात गणेशोत्सवानिमित्त वाहतुकीत मोठा बदल; 18 ते 25 सप्टेंबरदरम्यान 'हे' प्रमुख रस्ते राहणार बंद, जाणून घ्या महत्त्वाचे पर्यायी मार्ग

Gangapur Sugar Mill: गंगापूर सहकारी साखर कारखाना कर्जमुक्त करण्याचा निर्धार; जय हिंदने गाळप केलेल्या ऊसाचे बिल १५ दिवसांत देण्याचे आश्वासन

Social Media Ban : मुलांचं मानसिक आरोग्य धोक्यात? 13 वर्षांखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी; किशोरवयीनांसाठीही कडक नियम, EU Kids Act मध्ये काय आहे?

Pune BJ Medical College: बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील ३१ अध्यापक पदकपातीतून अध्यापन व रुग्णसेवेवर गदा

Latest Marathi News Update : वाघूळखेडा शिवारात शेतात काम करणाऱ्या मजुरांवर कोसळली वीज; दुर्घटनेत तीन महिलांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT