covid 19  Esakal
देश

Covid Update: देशात चोवीस तासांत ४१२ रुग्ण आढळले; कोरोनाचे संकट वाढण्याची शक्यता

देशातील कोरोनाचे संकट वाढू लागले असून सरत्या चोवीस तासात ४१२ नवे रुग्ण सापडले असल्याची माहिती आरोग्य खात्याकडून बुधवारी देण्यात आली.

सकाळ वृत्तसेवा

देशातील कोरोनाचे संकट वाढू लागले असून सरत्या चोवीस तासात ४१२ नवे रुग्ण सापडले असल्याची माहिती आरोग्य खात्याकडून बुधवारी देण्यात आली. दरम्यान जेएन.१ या अत्यंत घातक अशा व्हेरिएंटचे रुग्ण देखील वाढत असल्याने आरोग्य खात्याच्या काळजीत भर पडली आहे.

आरोग्य मंत्रालयाकडील आकडेवारीनुसार देशातील कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या चार हजार १७० इतकी झाली आहे. यात जेएन.१ व्हेरिएंटचे ६९ रुग्ण आहेत. आतापर्यंत सात राज्यात या व्हेरिएंटचे रुग्ण सापडलेले आहेत. कर्नाटक आणि केरळ या दोन राज्यात कोरोनाचा वेगाने फैलाव होत आहे.

गत चोवीस तासात केरळमध्ये कोरोनाचे सर्वात जास्त रुग्ण सापडले. जेएन.१ व्हेरिएंटचा विचार केला तर गुजरातमध्ये या व्हेरिएंटचे ३४ रुग्ण सापडले आहेत. यापाठोपाठ गोवा राज्यात १८, कर्नाटकमध्ये आठ, महाराष्ट्रात सात, केरळ आणि राजस्थानमध्ये प्रत्येकी पाच, तामिळनाडूमध्ये चार तर तेलंगणमध्ये एक व्हेरिएंटचे दोन रुग्ण सापडले आहेत.

या व्हेरिएंटचा पहिला रुग्ण केरळ राज्यात आठ डिसेंबर रोजी सापडला होता. या व्हेरिएंटचे सध्या फ्रान्स, अमेरिका, सिंगापूर, कॅनडा, ब्रिटन, स्वीडन आदी देशात मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trump Decision Impact: ट्रम्पचा डाव उलटणार? TCS, Infosys, Wiproसह भारतीय IT कंपन्यांना झटका देताना अमेरिकाच अडचणीत?

Ranji Trophy : रवींद्र जडेजाचे खणखणीत शतक, रिंकू सिंगनेही पार केला तिहेरी आकडा; दोघांची फटकेबाजी अन् प्रतिस्पर्धी गार...

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींचा ज्ञानेश कुमार यांना इशारा; म्हणाले, ‘तुमची झोप उडाली आहे, आम्ही तुम्हाला सोडणार नाही’

Indian Railway Recruitment: रेल्वेत सरकारी नोकरीची मोठी संधी! ३,५४८ जागा; कोण अर्ज करू शकतं जाणून घ्या

भाजप नेत्याची काठ्या-दगडांनी मारहाण करत हत्या, ५-६ जणांनी घेरलं अन्....; धक्कादायक VIDEO समोर

SCROLL FOR NEXT