corona vaccine sakal
देश

देशातील 16 राज्यांमध्ये 100 टक्के लसीकरण; आरोग्य मंत्रालयाने दिली माहिती

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचं थैमान सध्या सुरु आहे. मात्र, ही लाट दुसऱ्या लाटेइतकी गंभीर दिसून येत नाहीये. (Third Wave of Corona) सध्या देशातील कोरोनाची परिस्थिती नेमकी कशी आहे, ते आकडेवारीच्या माध्यमातून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry) सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच कोरोनाच्या संकटाला दोन हात करण्यासाठी लसीकरणाची मोहिम सुरु असून तिची सध्यस्थितीतील अवस्था कशी आहे, याबाबतची माहितीही देण्यात आली आहे. (Corona Vaccination in India)

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील 16 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 100 टक्के लसीकरण करण्यात आलं आहे. तर 4 राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 96-99 टक्के लसीकरण झालं आहे. देशातील 34 राज्यांमधील रुग्णांमध्ये तसेच पॉझिटीव्हीटी रेटमध्ये घसरण होताना दिसत आहे. केरळ आणि मिझोराम या दोन राज्यांमध्ये रुग्णसंख्या तसेच पॉझिटीव्हीटी रेट वाढताना दिसून येत आहे. याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

सध्या देशातील 11 राज्यांमधील शाळा पूर्णपणे सुरु असून 9 राज्यांमधील शाळा अद्यापही बंद आहेत, अशी माहिती शिक्षण मंत्रालयाने दिली. सध्याचा डेटा असं दाखवून देतो की, आधीच्या कोरोना रुग्णवाढीच्या तुलनेत सध्याच्या व्हेरियंटमधील परिस्थिती सुरक्षित आहे. तसेच कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांमधील मृत्यूची शक्यता कमी आहे. त्यामुळे ज्या रुग्णांना शस्त्रक्रियेची गरज आहे त्यांनी ते नाकारण्याची गरज नाही. ते करु शकतात, असं आरोग्य मंत्रालयाने सांगितलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

Child Crime: अल्पवयीन गुन्हेगारांना आता सवलत नाही? वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणणार; महाराष्ट्र सरकारचा मास्टरस्ट्रोक

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Latest Marathi News Live Update : बुलढाणा पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाच्या मागणीसाठी आमरण उपोषण; शिवसेना पदाधिकाऱ्यांचे आंदोलन

SCROLL FOR NEXT