punjab esakal
देश

'आप'ला 'स्पेशल' ट्रिटमेंट; उद्या शपथविधी आज सगळे निर्बंध हटवले

भगवंत मान यांच्या शपथविधीदरम्यान विशेष सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात येणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

देशातील पाच राज्यांत नुकत्याच विधानसभा निवडणुका पार पडल्या. या पाचपैकी चार राज्यात भाजपाने जोरदार विजय मिळवला. यावेळी पंजाबमध्ये मात्र आमआदमी (Aam Aadami Party) पक्षाने बाजी मारली. तब्बल ९२ जागा मिळवत 'आप'ने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. याच पार्श्वभूमीवर पंजाबचे १७ वे मुख्यमंत्री म्हणून आप नेते आणि मुख्यमंत्री पदाचे उमेदवार भगवंत मान हे शपथ घेणार आहेत. (Punjab Election 2022) या सोहळ्यासाठी आम आदमी पक्षाने जोरदार तयारी केली आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांचा उद्या शपथविधी असल्यानं आज पंजाबमधील कोविड-१९ चे सर्व नियम मागे घेतले आहेत.

भगवंत मान यांच्या शपथविधीदरम्यान विशेष सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात येणार आहे. कार्यक्रमस्थळी विशेष चौक्या लावण्यात आल्या आहेत. यासोबतच सीआयडी आणि इतर गुप्तचर यंत्रणांची देखील या सोहळ्यावर पूर्ण नजर असणार आहे. भगवंत मान यांनी याआधीच पंजाबच्या जनतेला शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्याचं निमंत्रण दिलं आहे. या ऐतिहासिक शपथविधीसाठी राज्यातील कोविड-१९ चे निर्बंधांत शिथिलता देण्यात आली आहे.

दरम्यान, पंजाबमध्ये पहिल्यांदाच आम आदमी पक्षाचा मुख्यमंत्री होणार आहे. त्यामुळे या तिहासक शपथविधी सोहळ्यासाठी आम आदमी पक्षाने जय्यत तयारी केली आहे. सोहळ्यावर सुमारे दोन कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. त्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. मान यांनी अनेक दिग्गज्जांना निमंत्रण दिलं असून, या कार्यक्रमासाठी सहा हजार पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT