kanhaiya-kumar 
देश

"भ्याड नक्षली हल्ल्यांत देशातील सर्वसामान्यांचं रक्त सांडतं"; कन्हैयाकुमार ट्वीटवरुन ट्रोल

सकाळ डिजिटल टीम

सीपीआय नेता आणि जेएनयूचा माजी विद्यार्थी नेता कन्हैया कुमारने छत्तीसगडमध्ये झालेल्या नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांबाबत एक ट्वीट केलं. या ट्वीटनंतर कन्हैयाला सोशल मीडियात युजर्सने ट्रोल केलं. कन्हैयाने आपल्या ट्वीटमध्ये शहीद जवानांना श्रद्धांजली वाहताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि त्यांचे पुत्र जय शहा यांच्यावर निशाणा साधला. त्यांच्या या ट्वीटवरच युजर्सनं आणि अनेक मान्यवरांनी कन्हैयाला धारेवर धरलं. 

कन्हैयानं ट्वीट केलं की, "बाप गृहमंत्री मुलगा बीसीसीआयचा सेक्रेटरी तर दुसरीकडे बाप शेतकरी आणि मुलगा जवान अशी परिस्थिती. लाज नसलेल्या सत्ताधाऱ्यांना विचारा की किती मंत्र्यांची मुलं सैन्यात सामिल होते? भ्याड नक्षली हल्ल्यात देशातील सर्वसामान्य लोकांचंच रक्त सांडतं आणि खुर्चीजीवी याचा फायदा घेतात. देशाला हे कट-कारस्थान कळायला हवं. वीर जवानांना आणि शेतकऱ्यांना नमन" कन्हैयाच्या या ट्वीटला १८ हजार पेक्षा अधिक लोकांनी लाईक केलं तर इतर युजर्सनं ट्रोल केलं. 

प्रसिद्ध गायिका मालिनी अवस्थी यांनी कन्हैयाकुमारच्या या ट्वीटवर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, "नेता होण्याच्या प्रयत्नात दारोदार भटकणारा, आपलं डिपॉझिटही वाचवू न शकलेला, देशात टुकडे टुकडे ची घोषणाबाजी करणारा, जवानांच्या बलिदानावर उत्सव साजरा करणारा, नक्षलींना क्रांतीकारी मानणारा, नक्षलकॉम्रेड पुन्हा बिळातून बाहेर आला आहे. नक्षलींच्या या पोषिंद्याला ओळखा आणि दूर करा." 

मालिनी अवस्थी यांच्याशिवाय टीव्ही अँकर ऋचा अनिरुद्ध हीने देखील कन्हैयावर टीकास्त्र सोडलं. तिनं म्हटलं की, "प्रश्न विचारणारे स्वतः सैन्यात भरती झाले नाहीत. उलट स्वतः नेता आणि मंत्री बनण्याची स्वप्न पाहत आहेत. मात्र, प्रश्न विचारायला काय जातंय? एक हल्ला झालाय, आपले जवान शहीद झालेत पण त्यातही राजकारण करण्याची संधी कशी सोडणार?" मलिनी अवस्थी आणि ऋचा अनिरुद्ध यांच्याशिवाय अनेक लोकांनी ट्विटरवर कन्हैया कुमारला प्रश्न विचारले आहेत. 

शनिवारी छत्तीसगडच्या बिजापूर येथे माओवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत सुरक्षा रक्षकांचे २२ जवान शहीद झाले. तर ३१ जवान या हल्ल्यात जखमी झाले होते. जखमी जवानांना रुग्णालयात भरती करण्यात आलं त्यांची प्रकृती गंभीर होती. याशिवाय कोबरा बटालियनचा एक जवान बेपत्ता आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crop Insurance: दुष्काळ जाहीर झाला! पीक विम्यासाठी काय करावं? किती पैसे मिळणार? पाहा संपूर्ण गणित

Asian Games 2026: अरे आवाजsss कुणाचा... भारतीय पुरुष कबड्डी संघाने जिंकले नववे सुवर्णपदक; रोमहर्षक लढतीत इराणवर विजय

Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर पुन्हा अपघात! थांबलेल्या टँकरला धडकून कारचा चुराडा, एकाचा मृत्यू

Dattatray Bharne Drought Relief : महाराष्ट्रातील दुष्काळावर कृषीमंत्री दत्तात्रय भरणे काय म्हणाले? किती टप्प्यात मदत करणार?

पुण्यात पोलिसाने गोळी झाडून घेत आयुष्य संपवलं, PMPLच्या बस डेपोत आढळला मृतदेह; ३ दिवसांपासून होते बेपत्ता

SCROLL FOR NEXT