cowin
cowin sakal media
देश

मराठीसह 10 प्रादेशिक भाषांमध्ये CoWIN पोर्टल

नामदेव कुंभार

Covid-19 च्या लसीची कमतरता संपूर्ण देशात आहे. यामुळे लस मिळवण्यास उशीर होत आहे. लस स्लॉट बुक करण्यासाठी तुम्हाला कोविन प्लॅटफॉर्मवर जावे लागते. लसीकरण सुरु झाल्यापासून कोविन CoWIN अॅप चर्चेत आलं आहे. पण फक्त इंग्रजी भाषा असल्यामुळे अनेकांना या अॅपचा वापर करता येत नव्हता. सरकारनं सर्वसामान्यांची अडचण पाहून प्रादेशिक भाषेतही या अॅप उपलब्ध करुन दिलं आहे. आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी यासंदर्भात घोषणा केली असून, कोविन अॅप मराठी, हिंदीसह अन्य 10 प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध होणार आहे. शुक्रवारापासून ही सुविधा सुरु झाली आहे. (CoWIN Portal Now Available In Hindi & 10 Regional Languages Including Punjabi, Marathi)

या 10 भाषेत अॅप -

हिंदी, मराठी, मल्याळम, पंजाबी, तेलगू, गुजराती, आसामी, बेंगाली, कनडा आणि ओडिया

17 मे रोजी आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी कोविन अॅप 14 प्रादेशिक भाषेत येणार असल्याची घोषणा केली होती. आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. नवीन कोरोना व्हॅरियंट शोधण्यासाठी देशात INSACOG नेटवर्कमध्ये आणखी १७ प्रयोगशाळा सुरु करण्यात येणार असल्याचेही यावेळी त्यांनी जाहीर केलं होतं. सध्या INSACOG नेटवर्कमध्ये १० प्रयोगशाळा असून त्या देशातील वेगवेगळ्या भागात आहेत.

तुम्हालाही लसीकरणासाठी रजिस्ट्रेशन करायचं असेल तुम्ही तीन पद्धतीने ते करु शकता. यात सेल्फ रजिस्ट्रेशन, ऑन-साईट रजिस्ट्रेशन आणि फॅसिलेटेड कोहोर्ट रजिस्ट्रेशन प्रोसेस यांचा समावेश होतो. सेल्फ रजिस्ट्रेशनसाठी तुम्हाला Cowin 2.0 App डाऊनलोड करावा लागेल. याशिवाय तुम्ही Arogya Setu आणि Co-WIN website (cowin.gov.in)वरुनही रेजिस्ट्रेशन करु शकता.

Co-WIN App वर रेजिस्ट्रेशन कसं करायचं?

- तुम्हाला सर्वात आधी CoWin app डाऊनलोड करावा लागेल

-रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला मोबाईल क्रमांक टाकावा लागेल, यावर तुम्हाला OTP येईल. तो टाकून व्हेरिफाय करा

- यानंतर तुम्ही लसीकरणाच्या पेजवर याल. यावर तुम्हाला फोटो आयडी प्रूफचा ऑप्शन निवडाला लागेल

-त्यानंतर तुम्हाला नाव, वय, लिंग टाकावा लागेल

-येथे तुम्हाला आयडेंटी प्रूफचे डॉक्युमेंट अपलोड करावा लागेल

- संपूर्ण डिटेल भरल्यानंतर तुम्ही रजिस्टर बटनवर क्लिक करु शकता. रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला आपल्या अकाऊंटवर डिटेल मिळून जातील

- तुम्ही एका मोबाईल क्रमांकावरुन तीन लोकांचे रजिस्ट्रेशन करु शकता

-यानंतर तुम्हाला Shedule Appointment च्या ऑप्शनवर क्लिक करावा लागेल

- त्यानंतर तुम्हाला राज्य, जिल्हा, ब्लॉक आणि पिन कोड टाकून लसीकरण सेंटर निवडू शकता

- त्यानंतर तुमच्यासमोर लसीकरणासाठी उपलब्ध असलेली तारिख दिसेल

- यानंतर तुम्हाला बुक बटनवर क्लिक करावं लागेल

-या सर्व प्रक्रियेनंतर तुम्हाला लसीकरण सेंटरच्या डिटेलचा मेसेज मिळेल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

ढिंग टांग : महाशक्तीचे महावाटप...!

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 03 मे 2024

आंबा : उन्हाळ्याचा अनभिषिक्त राजा

Latest Marathi News Live Update : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कोल्हापुरात दाखल, मतदारसंघातील प्रचाराचा घेणार आढावा

SCROLL FOR NEXT