cowin 
देश

CoWIN: 24 तासांत हजारहून अधिकवेळा सर्च आणि 50 ओटीपीनंतर व्हाल ब्लॉक

विनायक होगाडे

CoWin Portal: देशात सध्या कोरोना संकटाशी लढण्यासाठी लसीकरणाची मोहिम गतीने सुरु आहे. 16 जानेवारीपासून देशातील लसीकरणाची मोहिम सुरु करण्यात आलं. सुरुवातीला फ्रंटलाईन वर्कर्सपासून सुरु करण्यात आलेली ही मोहिम 18 वर्षे वयावरील सर्वांसाठी खुली करण्यात आली आहे. मात्र, ही लसीकरणासाठी रजिस्टर करण्याची प्रक्रिया ही ऑनलाईन असल्या कारणाने अनेक अडचणींना लोकांना सामना करावा लागतो आहे. कोविन पोर्टलबाबत सुरुवातीलाच बऱ्याच अडचणी आल्या होत्या. मात्र, आता त्यात सुधारणा करण्यासाठीचे प्रयत्न सुरु आहेत.

कोरोना काळात लस घेण्यासाठी लोकांना कोविन पोर्टलवर स्वत:हूनच रजिस्टर कराव लागत आहे, त्यानंतरच लोकांना कोरोनाची लस दिली जात आहे. त्यातच कोविन पोर्टलवर एका दिवशी अनेकवेळा सर्च रिक्वेस्ट येत आहे. मात्र, अजूनपर्यंत तरी कोणत्याही प्रकारची ऍक्शन कुणा युझरवर घेतली गेली नाहीये. मात्र आता लसीसाठी स्लॉटसाठी एक हजारहून अधिकवेळा सर्च करणाऱ्या अथवा 24 तासांच्या आत 50 ओटीपी जनरेट करणाऱ्यांना कोविनवरुन ब्लॉक केलं जाणार आहे. नव्या सिस्टीमनुसार, 15 मिनिटांच्या आत 20 हून अधिक वेळा सर्च केल्यास यूझरला कोविन पोर्टलवरुन लॉगआऊट केलं जाईल.

केंद्रीय अधिकाऱ्यांनी याबाबत म्हटलंय की, देशात जवळपास 6 हजार युझर्सना कोविन पोर्टल संशयास्पदरित्या वापरल्याने लॉगआऊट करण्यात आलं आहे. त्यांनी म्हटलंय की, आम्ही अशा युझर्सना ट्रॅक करत आहोत जे पोर्टलवर संशयास्पद कृती करत आहेत. त्यांना कायमस्वरुपीच पोर्टलवरुन ब्लॉक केलं जात आहे.

लस प्रमाणपत्रावरील चुका करा दुरुस्त

कोविन पोर्टलचे नवीन अपडेट आले आहे. या अपडेटनंतर आता कोविनवरुन तुम्ही लसीच्या प्रमाणपत्रावर झालेल्या कोणत्याही चुकीला दुरुस्त करु शकाल. जर रजिस्ट्रेशन करताना तुमचं नाव अथवा जन्मतारीखमध्ये एखादी चूक झाली असेल तर तुम्ही कोविन पोर्टलवर लॉगिन करुन ती चूक सुधारु शकता. कोविन पोर्टलसंदर्भात या नव्या अपडेटची माहिती आरोग्य सेतूच्या ट्विटर हँडलवरुन देण्यात आलीआहे. प्रमाणपत्रावर झालेल्या एखाद्या चुकीला सुधारण्यासाठी कोविन पोर्टलवर आता Raise an Issue चा पर्याय उपलब्ध असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

माेठी बातमी! वीज कंत्राटी कामगारांना मिळाला न्याय; न्यायालयाने ठरवले कायम कामगार, तेरा वर्षांनंतर लढ्याला यश..

जुन्या गाण्याची मेजवानी! अमिताभ यांच्या ‘शराबी’चा म्युझिकल अवतार! रंगमंचावर पुन्हा जिवंत होणार बप्पीदा यांची जादू!

Latest Marathi News Live Update : कोकणातील कात उद्योजक ईडीच्या रडारवर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये ईडीची धाड

सुकेवाडी गांजा तस्करी प्रकरणीतील दोषींवर कठाेर कारवाई करा: आमदार अमोल खताळ आक्रमक, गृहराज्यमंत्री काय म्हणाले?

Rajinikant Health Tips: सुपरस्टार रजनीकांत वयाच्या 75 व्या वर्षीही दिसतात फिट, ' या' 5 पांढऱ्या पदार्थांना ठेवतात दूर

SCROLL FOR NEXT