CR Kesavan Join BJP esakal
देश

CR Kesavan Join BJP: भारताच्या माजी गृहमंत्र्यांचा पणतू काँग्रेस सोडून भाजपमध्ये दाखल

रुपेश नामदास

भारताचे पहिले गव्हर्नर जनरल आणि काँग्रेसचे माजी नेते सी. राजगोपालाचारी यांचे नातू सीआर केशवन यांनी शनिवारी भाजपमध्ये प्रवेश केला. केशवन यांनी व्हीके सिंग, अनिल बलुनी आणि प्रेम शुक्ला यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला. सीआर केशवन यांनी फेब्रुवारीमध्ये काँग्रेसचा राजीनामा दिला होता.

सीआर केशवन यांनी 2001 मध्ये काँग्रेसचे सदस्यत्व स्वीकारले. यादरम्यान त्यांनी राजीव गांधी राष्ट्रीय युवा विकास संस्थेचे उपाध्यक्षपदही भूषवले. राजीनाम्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सीआर केसवन म्हणाले की, पक्ष सोडल्यानंतर मी काँग्रेसवर काय बोलावे असे मला वाटत नाही. काँग्रेसमध्ये सुरू असलेले राजकारण मला पटले नाही.

अशा स्थितीत पक्ष सोडणे योग्य होते, तेच मी आज केले. केशवन म्हणाले की, जेव्हा द्रौपदी मुर्मूच्या नावाची घोषणा करण्यात आली तेव्हा एका वरिष्ठ समिती सदस्याने ती दुष्ट तत्वज्ञानाचे प्रतिनिधित्व करत असल्याचे सांगितले होते.

 माजी संरक्षणमंत्री ए. के. अँटनी यांचे चिरंजीव अनिल अँटनी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आता ए. के. अँटनी यांनीही आपल्या मुलाच्या भाजप प्रवेशावर प्रतिक्रिया दिली, ते म्हणाले, अनिल यांच्या भाजप प्रवेशाच्या निर्णयाचा मला धक्का बसला आहे. हा अत्यंत चुकीचा निर्णय आहे. एकता आणि धार्मिक सलोखा हा भारताचा पाया आहे. तसेच नेहरू घराण्याशी माझी निष्ठा कायम राहील.

केरळ काँग्रेसने म्हटले की, आजचा दिवस विश्वासघाताचा आहे, अनिल अँटनी यांनी ईस्टर फेस्टिव्हल 2023 पूर्वी आपल्या वडिलांचा विश्वासघात केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT