anil jaisinghani 
देश

अमृता फडणवीस ब्लॅकमेल प्रकरणी आरोपी असलेल्या जयसिंघानीची ३.४० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त!

Sandip Kapde

Anil Jaisinghani : कुप्रसिद्ध क्रिकेट बुकी अनिल जयसिंघानी याची ३.४० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. अंमल बजावणी संचालनालयाने ही कारवाई केली आहे. PMLA प्रकरणी जप्तीची करवाई कारवाई करण्यात आली.

2015 साली गुजरातच्या वडोदरा येथे दाखल गुन्ह्यात ED ने केला ECIR दाखल केला होता. याप्रकरणी आरोपपत्र देखील दाखल केले होते. अमृता फडणवीस ब्लॅकमेल प्रकरणी जयसिंघानी आरोपी आहे.

गुजरातमधील वडोदरा पोलीस ठाण्यात 2015 मध्ये नोंदवलेल्या एफआयआरवर ईडीचा गुन्हा दाखल आहे. तपासादरम्यान, जयसिंघानी हा क्रिकेट सट्टेबाजीच्या कटात त्याचा सहभाग होता. या गुन्ह्यातील सह आरोपीच्या मदतीने फसवणुकीच्या माध्यमातून जयसिंघानी याने मोठ्या प्रमाणात पैसे जमा केल्याचे उघड झाले.

जयसिंघानी 2015 पासून ईडीचे समन्स टाळत असून 2015 मध्ये विशेष पीएमएलए कोर्टाने त्याच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट (NBW) जारी केले. तसेच तपासात जयसिघांनी सहकार्य करत नव्हता. 8 एप्रिल 2023 रोजी जयसिंघानीला ईडीने अटक केली होती.

त्यानंतर अहमदाबादमधील पीएमएलए कोर्टाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला होता.9 जून रोजी ईडीने जयसिंघानी यांच्या ओळखीच्या परिसरात छापा टाकला. ईडीने त्याची 3.40 रु. किमतीची स्थावर मालमत्ता शोधून जप्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दोन ट्रकच्या मधे कारचा चुराडा, एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू; घटनास्थळी रक्तामांसाचा चिखल, मृतदेह ओळखणंही कठीण

Gold Silver Price Drop : सोने, चांदी दर आणखी कमी होणार, एका आठवड्यात ३ हजारांची घसरण, खर कारण आलं समोर

Government Decision: राज्य सरकारचा मोठा निर्णय! इच्छापत्रांसाठी स्वतंत्र यंत्रणा; महापालिका आयुक्त, मुख्याधिकाऱ्यांकडे जबाबदारी..

Latest Marathi News Live Update: महामुंबईत उन्हाचा चटका, महाडमध्ये पारा ४५ अंशावर

IPL 2026: रिषभ पंतचा IPL मधील सर्वाधिक किमतीचा खेळाडू… पण फॉर्म तर कोठे गेला?; आज लखनऊ कोलकता आमनेसामने, पाहा संभावित Playing XI

SCROLL FOR NEXT