Rape case in hyderabad  Sakal
देश

धक्कादायक! युवतीवर वाढदिवसादिवशी तिच्या मित्राकडून बलात्कार

घरी सोडण्यासाठी बाहेर पडल्यानंतर मित्रानेच तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप युवतीने केला आहे.

सकाळ डिजिटल टीम

घरी सोडण्यासाठी बाहेर पडल्यानंतर मित्रानेच तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप युवतीने केला आहे.

हैदराबाद येथील जुबली हिल्स पबमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. गुजरातमधील एका युवतीवर पब पार्टीनंतर तिच्या मित्रानेच बलात्कार केला आहे. ही तरुणी शहरातील एक कंपनीत कंटेंट रायटर म्हणून काम करत आहे. याप्रकरणी तरुणीने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या घटनेमुळे पब परिसरात खळबळ उडाली आहे. (Rape case in hyderabad0

याप्रकरणी युवतीने दिलेल्या तक्रारीनुसार, संबंधित आरोपीने त्याच्या काही मित्रांसोबत युवतीचा जुबली हिल्स येथील प्रसिद्ध पब रिपेटमध्ये सोमवारी रात्री उशिरापर्यंत वाढदिवस साजरा केला. या पार्टीनंतर आरोपीने मित्रांसह तिला घरी सोडतो असे सांगितले. घरी सोडण्यासाठी बाहेर पडल्यानंतर मित्रानेच तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप युवतीने केला आहे.

याप्रकरणी पोलिस निरीक्षक रेड्डी यांनी दिलेल्या माहितीनुसार, युवतीच्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. संबंधित आरोपीला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. या घटनेत आरोपीसह आणखी तिघांना अटक करण्यात आली आहे.

महिलेने तक्रारीत म्हटले आहे की, सकाळी उठल्यानंतर तिच्या छातीत अचानक तीव्र कळा येऊ लागल्या आहेत. उठल्यानंतर तिला कळले की आरोपी तिच्यासोबत गैरप्रकार करण्याचा प्रयत्न करत आहे. याला तिने विरोध करताच आरोपीने तिला कोपराने दाबून तिच्यावर बलात्कार केला. या घटनेबाबत पोलिसांत तक्रार देणार असल्याने महिलेने सांगितले. तक्रार दिल्यास याचे गंभीर परिणाम भोगावे लागेतील अशी धमकी देऊन आरोपीने तिथून पळ काढला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT