boyfriend killed girlfriend in chhattisgarh 
देश

Crime News : भूत बनून त्रास देणारी गर्लफ्रेंड! बॉयफ्रेंडने सांगितली भयानक आपबीती

सकाळ डिजिटल टीम

Crime News : प्रत्येक प्रेमकथेचा शेवट गोड होतो असे नाही. अनेक प्रेमकथा भयानक असतात, त्याचा शेवट देखील भितीदायक असतो. अनेक युवकांनी प्रेमासाठी गुन्हा केल्याचे समोर आले आहे. मात्र एक विचित्र घचना छत्तीसगडमधील कोरबा येथे घडली. ही घटना वाचून पोलिसही शॉक झाले. आरोपीने जबाबात असे काही सांगितले की पोलिसांचा पायाखालची जमीन सरकली. (boyfriend killed girlfriend in chhattisgarh)

एक मुलगी एका मुलाच्या प्रेमात पडली आणि त्याच्यावर विश्वास ठेवला. पण मुलाने तिच्या प्रेमाचा आणि विश्वासाचा गळा दाबून तिची हत्या केली. पण मृत्यूनंतरही मुलीने मुलाचा पाठलाग सोडला नाही. नेमकं काय घडलं हे जाणून घेऊया. 

छत्तीसगडमधील कोरबा येथे २४ वर्षीय मुलगी ८ महिने झाली बेपत्ता होती. तिच्या बॉयफ्रेंडने तिची हत्या केली होती. गोपाल खाडिया, असे तिच्या बॉयफ्रेंडचे नाव आहे.

आपला गुन्हा लपवण्यासाठी आरोपी गोपालने गर्लफ्रेंडचा मृतदेह २० फूट खड्डा करुन पुरला. बऱ्याच प्रयत्नांनंतर पोलिसांना मृतदेह सापडला आणि आरोपीलाही पकडले. मात्र यादरम्यान आरोपीने धक्कादायक खुलासा केला.

पोलिसांनी  गोपाल खाडिया याला ताब्यात घेतले. यावेळी चौकशीत त्याने धक्कादायक खुलासा केला. आरोपीने गुन्हा कबूल केला. तसेच तो ८ महिने झाले तो भीतीत जगत आहे. कारण त्याच्या मैत्रिणीचे भूत त्याला रात्रंदिवस त्रास देत असून त्याला शांतपणे जगू देत नाही, असा खुलासा गोपालने केला. 

आपला गुन्हा लपविण्यासाठी त्याने आपल्या मैत्रिणीचा गळा आवळून खून केला आणि मृतदेह पुरल्याची कबुलीही आरोपीने दिली आहे. पोलिसांनी मृतदेहाचा सांगाडा बाहेर काढला. मृतदेहा सांगडा पाहून मुलीच्या आईने हंबरडा फोडला आणि आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली.

गोपालने पोलिसांना जबाबात सांगितले की तो वीटभट्टीवर ट्रक चालक म्हणून काम करत असे. पीडित मुलगी देखील तिथेच भट्टीत विटा भरण्याचे काम करायची. यादरम्यान दोघांची भेट झाली. दोघेही एकमेकांशी बोलत राहिले आणि त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले.

दोघेही गेल्या ३ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. मात्र मुलीने लग्नासाठी तकादा लावला. त्यामुळे दोघांमध्ये भांडणे सुरू झाली आणि त्यामुळे त्रस्त होऊन गोपालने अंजूला आयुष्यातून हटवण्याचा प्लॅन आखला आणि तिचा गळा दाबून खून केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunetra Pawar: चाकणकरांसाठी मोठी बातमी! वाहतूक कोंडी, खड्डे अन् अतिक्रमणांवर प्रशासनाची धडक कारवाई, उपमुख्यमंत्री पवार यांचे निर्देश

Mhaisal Canal Accident : कवठेमहांकाळमध्ये दुर्दैवी घटना! म्हैसाळ योजनेच्या कालव्यात कार कोसळून तरुण गेला वाहून; रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम सुरू

Tukaram Mundhe : कामातचं नाही सोशल मीडियावरही तुकाराम मुंढेंचा जलवा; देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, विश्वास नांगरे- पाटलांना टाकलं मागे

Marathi News Live Updates : २०२७च्या जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकान्याची मागणी, राज्यस्तरीय मोर्चासह देशव्यापी आंदोलनाची तयारी

Nipani Tavandi Ghat Case : राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी घाटाजवळ दगडाने ठेचून गडहिंग्लज साखर कारखान्यातील कर्मचाऱ्याचा खून; महमदवर धारदार शस्रानेही हल्ला

SCROLL FOR NEXT