Goat Goat
देश

बकऱ्याऐवजी त्याने कापली माणसाची मान; रुग्णालयात मृत्यू

बकऱ्याचा बळी देणाऱ्या व्यक्तीने चक्क बकऱ्याला धरून असलेल्या माणसाचीच मान कापली

सकाळ डिजिटल टीम

आपल्या देशात देवावर विश्वास ठेवणाऱ्यांची कमी नाही. कोणतेही चांगले काम करण्यापूर्वी देवाचे नाव घेतले जाते. तसेच मनातील इच्छा, नवस किंवा एखादी आनंदाची गोष्ट घडल्यास देवाला नवस देण्याची प्रथा आहे. याला विरोध होत असला तरी नवस दिलेच जातात. यामुळे बकरा (Goat), कोंबडीचा बळी दिला जातो. सणानिमित्त बकऱ्याचा बळी दिली जात असताना चक्क माणसाची मान कापण्यात (Man neck was cut off) आली. ही घटना आंध्र प्रदेशातील चित्तूर येथे घडली.

न्यू इंडियन एक्स्प्रेसमधील वृत्तानुसार, आंध्र प्रदेशातील (andhra pradesh) चित्तूर वलसापल्ले येथील मंदिरात संक्रांतीनिमित्त बलिदानाची प्रथा आहे. येथील लोक दरवर्षी संक्रांतीत प्राण्यांचा बळी देतात आणि येल्लम्मा मंदिरात अर्पण करतात. दरवर्षीप्रमाणे यंदाही बळी देण्याचा कार्यक्रम आयोजिण्यात आला होता. बळी देण्यासाठी बोकडही (Goat) आणला होता.

मात्र, बळी देताना असे काही घडले की एकच खळबळ उडाली. बलिदान सुरू असताना बकऱ्याचा बळी देणाऱ्या व्यक्तीने चक्क बकऱ्याला (Goat) धरून असलेल्या माणसाचीच मान (Man neck was cut off) कापली. यात तो रक्तबंबाळ होऊन कोसळला. मान कापणाऱ्याचे नाव चालपथी असून, बकरा धरणाऱ्याचे नाव सुरेश आहे. मान कापणारा चालपथी हा दारूच्या नशेत होता. त्याने दारूचे सेवन केले होते. सुरेशला जवळच्या मदनपल्ले येथील शासकीय रुग्णालयात नेले असता त्याचा मृत्यू झाला, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

दोघांत काही वाद होता का?

या घटनेनंतर आरोपीला अटक करण्यात आली. मृत सुरेश विवाहित असून त्याला दोन मुले आहेत. चालपथीचा सुरेशसोबत काही वाद होता का, याची पोलिस चौकशी करीत आहेत. पुढील तपास सुरू करण्यात आला असून, संबंधित पक्षांचीही चौकशी सुरू असल्याचे पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT