देश

Crime: व्हिडीओ गेममुळे अल्पवयीन मुलाचा खून ? चौथीच्या मुलांनी केले होते १०० वार, CCTV फुटेज देण्यात शाळेची दिरंगाई

चौथी इयत्तेत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलाची हत्या, तीन वर्गमित्रांनी कर्कटकने केले १०० वार

सकाळ डिजिटल टीम

Indore Crime News:मध्य प्रदेशातील इंदूर शहरातील एका खासगी विद्यालयात इयत्ता चौथीमध्ये शिकत असलेल्या एका विद्यार्थ्याचा त्याच्या तीन मित्रांनीच खून केल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी उघडकीस आला आहे. शुक्रवारी(ता.२४) ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले.

खून करणाऱ्या मुलांनी कर्कटक आणि कंपासच्या साहाय्याने खून पीडित मुलावर १०० पेक्षा अधिक वार केल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेची दखल घेत स्थानिक बालकल्याण समितीने पोलिसांकडून याप्रकरणी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

या हल्ल्यामागील कारण अद्याप समजले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणातील आरोपी हे अल्पवयीन असून त्यादृष्टीने पोलिसांकडून योग्य ती पावले उचलण्यात येत आहेत. व्हिडिओ गेममधील हिंसक दृश्‍यांचा या मुलांच्या मनावर परिणाम झाला असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

‘‘माझ्या मुलावर शुक्रवारी दुपारी शाळेच्या आवारात त्याच्याच वर्गातील विद्यार्थ्यांनी हल्ला केला. यामागील कारण अद्याप समजलेले नाही. मी शाळेच्या व्यवस्थापनाला संबंधित घटनेचे सीसीटीव्ही फुटेज मागितले आहे, मात्र मला अद्याप सीसीटीव्ही फुटेज देण्यात आलेले नाही.’’ असा दावा पीडित मुलाच्या वडिलांनी केला. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT