देश

सरकारवर टीका म्हणजे देशद्रोह नाही : न्यायाधीश गुप्ता

वृत्तसंस्था

अहमदाबाद : भारतीयांना सरकारवर टीका करण्याचा अधिकार आहे आणि त्यांनी केलेल्या टीकेला देशद्रोह म्हणता येणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश दीपक गुप्ता यांनी सांगितले. तसेच सरकारवरील टीकेला देशद्रोह ठरवल्यास देशातील परिस्थिती कठीण होईल, असेही ते म्हणाले.

अहमदाबाद येथे आयोजित एका कार्यक्रमात न्यायाधीश गुप्ता बोलत होते. यावेळी त्यांनी वकिलांना मार्गदर्शनही केले. ते म्हणाले, प्रशासन, न्यायव्यवस्था आणि लष्करावर अनेकदा टीका केली जाते. त्यांच्या या टीकेला देशद्रोह म्हणता येणार नाही. आपण संस्थांवर होणारी टीका बंद करण्याचा प्रयत्न केला तर परिस्थिती बिकट होईल. असे झाल्यास लोकशाहीसाठी धोका असेल, असे गुप्ता म्हणाले. 

तसेच ते पुढे म्हणाले, संविधानाने दिलेला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार मला महत्त्वाचा वाटतो. संविधानाने प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार दिला आहे. मात्र, त्यामध्ये मतभिन्नता व्यक्त करण्याचा अधिकारही आहे. 

...तर नवी व्यवस्था निर्माण होणार नाही

नव्या वाटा काय आहेत, हे समजायला हवे. व्यक्तीने जुन्या व्यवस्थेविरोधात प्रश्नच उपस्थित केले नाहीत, तर नवी व्यवस्था निर्माणच होऊ शकणार नाही, असेही ते म्हणाले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs PBKS Weather: 'कालबैसाखी’ने नाइट रायडर्सचे टेंशन वाढवले; कोलकाताहून Live अपडेट्स, कट ऑफ टाईम अन् नियम Explain

'धनंजय माने...' नाटकानंतर बऱ्याच वर्षांनी प्रिया बेर्डेंचा रंगभूमीवर दमदार कमबॅक ! या दिवशी होणार शुभारंभ

IPL 2026 तिकिट खरेदी करताय, सावध व्हा! २५ वर्षीय युवकाने आईच्या अकाऊंटमधून RCB vs CSK मॅच तिकीटासाठी लाखो रुपये पाठवले अन्...

Mumbai News : मध्य-पूर्वेतील युद्धाचे सावट; मुंबई–विजयदुर्ग रोरो सेवेला ग्रहण, सेवा किमान महिनाभर ठप्प

Latest Marathi News Live Update: अजूनही निवडणूक बिनविरोध होऊ शकते- चंद्रकांत पाटील

SCROLL FOR NEXT