Gujrat Video 
देश

Video: ग्राम सुरक्षा दलाच्या ६०० जागांसाठी उमेदवारांची तुडुंब गर्दी, पोलिसांचा लाठीचार्ज!

गर्दीमुळं निर्माण झाली चेंगराचेंगरीची परिस्थिती

Amit Ujagare (अमित उजागरे)

पालनपूर : देशात बेरोजगारीचा प्रश्न आवासून उभा असल्याचं भीषण वास्तव एका व्हायरल व्हिडिओ समोर आलं आहे. गुजरातमधला हा व्हिडिओ असून इथल्या पालनपूर भागात ग्राम सुरक्षा दलामध्ये ६०० जागांसाठी अर्ज मागवण्यात आले होते. या जागांसाठी भरतीच्या ठिकाणी इच्छुक उमेदवारांनी तुडुंब गर्दी केली होती. एएनआयनं हा व्हिडिओ ट्विट केला आहे.

या व्हायरल व्हिडिओमध्ये ग्राम सुरक्षा दलातील ६०० जागांच्या भरतीसाठी सुमारे दुपट्टीहून अधिक इच्छुक उमेदवार आल्याचे दिसत आहे. या उमेदवारांची इतक्या मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली आहे की, तिथं गर्दी नियंत्रणासाठी उपस्थित असलेल्या पोलिसांना अक्षरशः लाठीचार्ज करावा लागला. यावेळी चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली होती.

कोविड काळात अनेकांच्या गेल्या नोकऱ्या

शिक्षण संस्था आणि विद्यापीठांमधून शिक्षण पूर्ण करुन बाहेर पडणाऱ्यांची संख्या आणि बाहेर सरकारी आणि खासगी क्षेत्रांमध्ये असलेल्या नोकऱ्यांची संख्या यांच्यामध्ये मोठी तफावत आहे. कौशल्ये आत्मसात केलेली असली तरी मुळात नोकऱ्यांची संख्याच कमी असल्यामुळं उच्चशिक्षित उमेदवार कमी कौशल्याची काम मिळवण्यासाठीही धडपडताना दिसत आहेत. त्यातच कोविडच्या काळात सर्वच क्षेत्रांना जबर फटका बसल्यानं अनेकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत, त्यामुळे आता पुन्हा सर्वकाही रुळावर येत असताना असे तरुण नोकऱ्यांसाठी धडपडताना दिसत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kedgaon Crime : केडगावातील गर्भलिंग निदान रॅकेटची व्याप्ती मोठी; दोघेजण अद्याप फरार, आणखी काहींचा सहभाग असण्याची शक्यता

Abdul Sattar: अब्दुल सत्तारांची नाराजी दूर, मुलाचा उमेदवारी अर्ज उद्या माघारी घेणार

Donald Trump: मोज्तबा खामेनेई यांची भेट घेण्याची डोनाल्ड ट्रम्प यांची इच्छा; नेतन्याहू यांच्याशी वादावादीनंतर ट्रम्प यांचा भलताच प्लॅन

Pune Toxic Liquor Case: विषारी दारूसाठी रसायन पुरविणाऱ्या पिता-पुत्राला नवी मुंबईतून अटक; तपासासाठी दहा पथके

Lowest Price Electric Scooter : 50 हजारपेक्षा कमी किंमतीत इलेक्ट्रिक स्कूटर; सगळ्यात स्वस्त आहेत 'या' 3 गाड्या, दमदार रेंज

SCROLL FOR NEXT