Check Today's Petrol Diesel Price Updates  esakal
देश

कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घट; पेट्रोल डिझेलचे दर कमी होणार?

गेल्या काही दिवसांपासून महगाईचा आलेख वाढताच आहे. त्यामुळे सामान्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून महगाईचा (Inflation) आलेख वाढताच आहे. त्यामुळे सामान्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. त्यात पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) दरही काही केल्या कमी होताना दिसत नाही. मात्र, आता पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होण्याची शक्यता दाट झाली आहे. कारण गेल्या 24 तासांत आंतराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती 9 डॉलर इतकी मोठी कपात करण्यात आली आहे. त्यामुळे गगनाला भिडलेल्या इंधनाच्या किमती कमी होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Petrol Diesel Price News In Marathi )

काही दिवसांपूर्वी जागतिक बाजारपेठेमध्ये कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केंद्रीय कर कमी करण्याची घोषणा केली होती. यानंतर देशभरात पेट्रोल 9.50 रुपयांनी तर डिझेल 7 रुपयांनी स्वस्त झालं होतं. त्यानंतर इंधनाचे दर स्थिर आहेत. केंद्राच्या या निर्णयानंतर देशातील अनेक राज्यांनी व्हॅट कमी करत सामान्यांना दिलासा दिला होता. मात्र, महाराष्ट्रातील ठाकरे सरकराने व्हॅटच्या किमतीत कोणताही बदल केला नव्हता.

शिंदेंकडून व्हॅट कमी करण्याची ग्वाही

दरम्यान, काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात नव्याने अस्तित्त्वात आलेल्या शिंदे सरकारने लवकरच राज्यातील पेट्रोल डिझेलवरील व्हॅट कमी करून सामान्यांना दिलासा देणार असल्याची ग्वाही दिली आहे. त्यात आता आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती 9 डॉलरने कमी झाल्या आहेत. त्यामुळे याचा परिणाम इंधनाच्या किमतींव नक्कीच होणार असून, लवकरच पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होऊन सामान्यांना दिलासा मिळेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

सध्या देशातील प्रमुख शहर मुंबईत पेट्रोल 111.35 तर डिझेल 97.28 रुपये प्रतिलिटर आहे. दिल्लीतही पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर असून, येथे पेट्रोल 96.72 आणि डिझेल 89.62 प्रतिलिटर आहे. तर पुण्यात पेट्रोलचे दर प्रति लिटर 110.88 तर डिझेल 95.37 रुपये प्रति लिटर आहे. त्यापाठोपाठ नागपूरमध्ये पेट्रोल 111.08 आणि डिझेल 95.59 रुपये प्रति लिटरवर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

JP Nadda: आरक्षण हटाओ आंदोलन! शिष्टमंडळाने घेतली जेपी नड्डांची भेट; 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा

Marathi News Live Updates : नेपाळमधून जी दृश्ये समोर येत आहेत, ती अत्यंत विनाशकारी आणि हृदयद्रावक आहेत - आदित्य ठाकरे

WTC 2025-27: भारतीय संघाचं गणित बिघडलं! श्रीलंकेविरुद्धच्या 'ड्रॉ'नंतर Points Table मध्ये टीम इंडिया कोणत्या स्थानावर

Marathi Language Rule: ऑटो-टॅक्सी चालकांना दिलासा! मराठी शिकण्यासाठी एक वर्षाची मुदत; देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय

Car Care Tips: कारमध्ये फोन चार्ज करताय? 'या' ४ चुकांमुळे मोबाईलचा ब्लास्ट अन् कारची बॅटरी होऊ शकते डेड!

SCROLL FOR NEXT