Curfew at Jammu and Kashmir Doda Bhadrawah security forces deployed outside mosques offensive post on Muslim community  
देश

भद्रवाह येथे संचारबंदी कायमच

शुक्रवारचा नमाज शांततेत; मशिदीबाहेर जादा सुरक्षा दल तैनात

सकाळ वृत्तसेवा

श्रीनगर : जम्मू काश्‍मीरच्या डोडा जिल्ह्यात भद्रवाह शहरात गेल्या नऊ दिवसांपासून संचारबंदी लागू आहे. आज शहरातील अनेक मशिदींबाहेर अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्यात आले. प्रेषित महंमद पैगंबर यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्तबाबत स्थानिक कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केल्यामुळे धार्मिक दंगल उसळली होती. भद्रवाह येथे गुरुवारी दोनदा संचारबंदी शिथिल करण्यात आली. यादरम्यान शहरात शांतता होती आणि कोणतिही अप्रिय घटना घडली नाही.

काल वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेतला. शुक्रवारच्या नमाजाच्या काळात कोणतिही अप्रिय घटना होऊ नये यासाठी संचारबंदी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला.

जम्मू जिल्ह्यात निदर्शने

जम्मू जिल्ह्यात शुक्रवारी रस्त्यावर निदर्शने न करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले होते. तसेच मशिदीबाहेर मोठ्या प्रमाणात पोलिस कर्मचारी तैनात केले होते. आज कोठेही अप्रिय घटना झाली नसल्याचे वृत्त आहे. आठवडाभरापूर्वी शहरातील अनेक भागात निदर्शने झाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

Rahul Narwekar : अलिबागमध्ये नेमकं काय घडलं होतं? राहुल नार्वेकरांनी सांगितला घटनाक्रम; संजय राऊतांनाही दिलं आव्हान

Beed News : बीडमध्ये ‘लेडी बाऊन्सर्स’ची एन्ट्री; बिल्डरभोवती महिला सुरक्षेची कडेकोट फौज! जमिनीच्या वादानंतर घेतला अनोखा निर्णय

SCROLL FOR NEXT